file photo
file photo 
विदर्भ

गावागावांत "अपनी तरफ तो भाऊच चला'ची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : चार विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. चारही मतदारसंघात एकूण 47 उमेवार रिंगणात होते.  अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून "भाई अपनी तरफ तो अपना भाऊच चला' हीच चर्चा ऐकू येत आहे. याचा निकाल लवकरच कळणार असला; तरी कार्यकर्त्यांची गोळाबेरीज सुरूच आहे. रंगणाऱ्या या चर्चा कानावर आल्या की खरच कायकर्ते काय असतात याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
या चर्चेकरिता तर काहींनी आपली ताकद लावून निवडणूक विभागातून बूथनिहाय झालेल्या मतदनाची आकडेवारी काढली आहे. यातून कोणत्या बूथवर किती टक्‍के मतदान झाले, या गावात आपला कार्यकर्ता कोण होता. त्याने काम केले की नाही याची गोळाबेरीज सुरू आहे. या गोळाबेरजेत आपले मतदान किती, गत निवडणुकीत आपल्या पक्षाला आणि अपक्ष उमेदवाराला किती मत मिळाले होते. याची आकडेमोड करण्यात कार्यकर्ते व्यस्त आहेत. या टक्‍केवारीच्या कारणावरून काही ठिकाणी तर भाडणे होत असल्याचे दिसून आले आहे.
काही उमेदवारांकडून तर प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरू झाले आहे. या बैठकांत त्यांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांवर त्यांच्या भागात उमेदवाराचे काम केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा ठपका त्या भागात झालेल्या मतदानाच्या टक्‍केवारीवरून ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गावातून मतदार काढण्यात कुचराई केल्याचा आरोप आहे.

कार्यकर्ते श्रमपरिहारासाठी बाहेरगावी
उमेदवाराचा प्रचार आणि मतदानाच्या दिवशी धावपळ करून थकलेले काही खास कार्यकर्ते श्रमपरिहारासाठी बाहेरगावी गेल्याची माहिती आहे. काहींनी तर त्यांचा भ्रमणध्वनीही स्वीच ऑफ केला आहे; तर काही कार्यकर्त्यांनी त्यांचा श्रमपरिहार मतदानाच्या दिवशी रात्रीच घेतला आहे. या कार्यकर्त्यांची जबाबदारी काही धाबेमालकांकडेच होती.
----
कुठे धाकधूक तर काहींना शाश्‍वती
मतदान झाले. त्याची टक्‍केवारीही कळली. यामुळे काही उमेदवारांना आपल्या विजयाची शाश्‍वती आली; तर काहींची धाकधूक वाढली आहे. झालेल्या टक्‍केवारीतील आपले किती याची आकडेमोड या उमेदवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT