student 
विदर्भ

अमरावती जिल्ह्यातील या तालुक्यात आहेत उर्दू माध्यमाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित 

विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) ः शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनातर्फे विशेष लक्ष दिले जाते. असे असताना चांदूररेल्वे शहरासह तालुक्‍यातील उर्दू माध्यमाचे विद्यार्थी मात्र महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तत्काळ पावले उचलून शहरात उर्दू माध्यमाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. 

चांदूररेल्वे शहरात दोन हजारांच्या जवळपास मुस्लीम समाजाची लोकसंख्या आहे. याशिवाय ग्रामीण भागातही मुस्लीम लोकसंख्या आहे. शहरात स्थानिक नगरपरिषदेद्वारा संचालित आझाद उर्दू शाळा असून येथे दहावीपर्यंत शिक्षण आहे. शाळेची मोठी दुमजली इमारत असून मोठे क्रीडांगणसुद्धा आहे. मागील दोन वर्षे या शाळेचा निकाल १०० टक्‍के लागला तर यावर्षी निकाल ९५.६५ टक्‍के लागला आहे.

चांदूररेल्वे तालुक्‍याचे ठिकाण असतानाही येथे केवळ दहावीपर्यंत उर्दू माध्यमाचे शिक्षण आहे. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अमरावती, कुऱ्हा, धामणगावरेल्वे, नांदगावखंडेश्‍वर याठिकाणी जावे लागते. परंतु परिस्थितीअभावी अनेक विद्यार्थी दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकत नाहीत. अनेकवेळा निवेदने देऊन उर्दू माध्यमाचे ११ वी, १२ वी सुरू करण्याची मागणी केली होती. 

सदर महाविद्यालय सुरू करण्यासाठी उर्दू शाळेचीच मोठी जागा उपलब्ध आहे. अशातच सहा ते सात वर्षांपूर्वी एकवेळा यासंदर्भात नगरपरिषदेत ठराव घेण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी पुढे झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या अति आवश्‍यक बाबीसाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

उर्दू कॉलेजसाठी प्रयत्नरत ः नगराध्यक्ष सूर्यवंशी 

उर्दू महाविद्यालयाची मागणी शहरवासीयांची अनेक दिवसांपासूनची आहे. यासाठी मी प्रयत्नरत आहे. याचा पाठपुरावा शिक्षण विभागाकडेसुद्धा करणार आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापर्यंत व माझ्या कार्यकाळातच उर्दू कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे मत नगराध्यक्ष शिट्टू ऊर्फ नीलेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. 

एकीकडे शासन शिक्षणाची सक्ती करीत असताना दुसरीकडे मुस्लीम विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. परिस्थितीअभावी बरेच विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शिक्षण थांबत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत शहरातील मुस्लीम भागातील नेते अनिस सौदागर यांनी म्हटले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT