zp education 
विदर्भ

शिक्षक पती-पत्नी विषाची बाटली घेवून जिल्हा परिषदेत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : खासगी शिक्षण संस्थेतील एक शिक्षण बुधवारी जिल्हा परिषदेत पत्नीसह विषाची बाटली घेवून पोहोचला. शिक्षणाधिकाऱ्यांकडे वेतन रखडल्या प्रकरणी असलेल्या सुनावणीच्या वेळी आत्महत्येची धमकी देत या शिक्षकाने चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनीही बोलवण्यात आले.


पिंजर येथील प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शामकी माता प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रवीण गणेश चव्हाण यांचे वेतन संस्थेकडून रोखण्यात आले. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडे असलेल्या सुनावणीसाठी त्यांनी त्यांचा जबाब नोंदविला आहे. त्यानुसार त्यांचे वेतन मार्च 2015 पासून थांबले आहे. निममित शाळेत अध्यापनाचे काम केले असून, मुख्याध्यापकांचा प्रभारही सांभाळला आहे. प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवांच्या म्हणण्यानुसार चव्हाण यांना कामावरून कमी केले. मात्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण प्रलंबित असताना कामावरून कसे कमी केले, चाैकशी करण्यात आली हाेती काय आदी प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. त्यासोबतच काेणतेच पत्र मिळाले नसल्याचेही त्यांनी जबाबात स्पष्ट केले. यावरच शिक्षणाधिकाऱ्यांकडे बुधवारी सुनावणीसाठी शिक्षक पत्नीसह शिक्षण विभागात आले होते. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात सुनावणीसाठी संस्थेचे संचालकही बसले हाेते.

शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग या व्हिडिओ काॅर्न्फरसिंगसाठी सीईओंच्या दालनात गेल्या हाेत्या. त्यामुळे संस्थेशी संबंधित लाेक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात कसे बसले, माझे वेतन का देण्यात येत नाही, असे एक ना अनेक सवाल शिक्षकाने केले. काही वेळातच शिक्षणाधिकारी कक्षात आल्या. त्यांनी सुनावणीची तयारी दर्शविली. मात्र शिक्षकाने पुन्हा त्यांच्या कक्षात धाव घेत संस्थेशी संबंधत असलेल्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर सुनावणी झाली. सुनावणीनंतर शिक्षक व संस्थेशी संबंधित सर्व शिक्षण विभागाच्या इमारतीवरून खाली आले. याठिकाणी शिक्षक पुन्हा संस्थेशी संबंधित असलेल्या दाेघांच्या अंगावर धावून गेला. मात्र पाेलिस आणि जि.प.तील आवारातील काहींनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. 

अहवाल सादर करणार
शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग यांनी यासंबंधी सर्व माहिती घेवून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगून संस्थेवर प्रशासकाची नियुक्तीची शिफारसही केली जाऊ शकते, असे सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Price Hike : चहा महागला! युद्धाचा फटका थेट चहावर; प्रति कप ₹1 दरवाढ

IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

AI Courses : घरबसल्या फ्रीमध्ये शिका AI अन् मिळवा लाखोंची नोकरी, सरकारकडून १५,००० स्कॉलरशिप, काय योजना आहे पाहा

Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT