shikshak mitra 
विदर्भ

अभिनंदनीय पाऊल! आता शिक्षकमित्र देणार विद्यार्थ्यांना धडे

प्रशिक मकेश्वर

तळेगावठाकूर (जि. अमरावती) : कोरोनामुळे शैक्षणिक सत्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही, सर्व शाळा- महाविद्यालये बंद आहेत. मात्र अमरावती जिल्हा परिषदेने शिक्षकमित्र नेमून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू केल्या आहेत, शाळेत वर्ग न भरवता समाज मंदिरासारख्या सुरक्षित ठिकाणी किंवा कोणाच्या तरी घरात विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेतून आधार मिळाला आहे.

26 जुलैपासून शैक्षणिक सत्र सुरू करण्यात येते, यंदा कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शाळा बंद आहेत. मात्र ज्याठिकाणी कोरोना रुग्ण नाहीत तिथे पालकांची परवानगी घेऊन अमरावती जिल्हा परिषदेने शिक्षकमित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले आहेत. यात सोशल डिस्टन्स राखून 50 टक्‍के विद्यार्थी शाळेत बोलावून शाळा सुरू करण्यात आल्या.

तिथे शिक्षकमित्र विद्यार्थ्यांना धडे देत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी आता पूर्वीसारखे शिक्षण घेऊ लागले आहेत. तिवसा तालुक्‍यात 394 शिक्षकमित्र नेमण्यात आले. यात तिवसा केंद्रात 40 शिक्षकमित्र आहेत. या योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

मानधनाचा अभाव
कोरोनामुळे शाळा सुरू करण्याचे आदेश अजूनपर्यंत मिळाले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकमित्र नेमून हे वर्ग सुरू केले. मात्र या शिक्षकमित्रांना कुठलेही मानधन नाही. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून शिक्षकमित्रांना शासनाकडून काही तरी मानधन मिळावे, अशी अपेक्षा शिक्षकमित्रांना आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीदेखील काळजी
अतिशय चांगल्या पद्धतीने वर्ग चालू आहेत, यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेतली जात आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षकमित्रांची निवड करण्यात आली. वर्ग नियमितपणे चालू आहेत की नाही, याची शहानिशासुद्धा केली जात आहे.
दलवीर व्यास, शाळा केंद्रप्रमुख.


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात करणार हजर

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT