google classroom. 
विदर्भ

गुगल क्‍लासरूम प्रशिक्षणाकडे नागपूर विभागातील शिक्षकांची पाठ

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि.वर्धा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी राज्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गुगल क्‍लासरूम प्रशिक्षण ठेवले आहे. मात्र, त्याच्या नोंदणीकडे नागपूर विभागातील शिक्षकांनी पाठ दाखविल्याचे पुढे आले आहे.

याकरिता शिक्षकांना तीन तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण असणार आहे त्यासाठी राज्यातील शिक्षकांना http://google.addinng dimension.in/Home.apsx या लिंकवर नावे नोंदवायची होती. मात्र 12 जुलै 2020 पर्यंत राज्यातील 54,824 शिक्षकांनी नावे नोंदवली तर नागपूर विभागातील केवळ 3,448 शिक्षकांनी नावे नोंदविली. या संख्येवरून नागपूर विभागातील शिक्षक गुगल क्‍लासरूम प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करता यावे, विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अध्यापन, गृहपाठाच्या सूचना त्यांच्या सोयींचा पाहिजे तेव्हा लाभ देता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गुगल क्‍लासरूम ही सुविधा मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शिक्षक विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांचे शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्यःस्थितीत शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षक एकावेळी कमाल 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकतात.
सदर सुविधा राज्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी उपलब्ध होणार असली तरी पहिल्या टप्प्यात राज्यस्तरावरून राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय यामधील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी गुगल क्‍लासचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात खासगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये खासगी विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे

नागपूर विभागातील शिक्षकांची जिल्हा निहाय नोंदणी संख्या
जिल्हा      शिक्षक संख्या
नागपूर     1505
चंद्रपूर        675
वर्धा          365
गोंदिया     357
भंडारा       313
गडचिरोली 233


संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT