phd student 
विदर्भ

तंत्रशिक्षण परिषदेची पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ताकीद, दस्तऐवज सादर करा अन्यथा स्कॉलरशिप बंद 

सुधीर भारती

अमरावती  : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पीएचडी पदवीसाठी प्रवेशित आणि नॅशनल डॉक्‍टर फेलोशिप प्राप्त संशोधक विद्यार्थ्यांनी तत्काळ त्यांच्या विद्यापीठात संशोधक विद्यार्थी म्हणून नोंदणीबाबत दस्तावेज सादर करण्यासाठी सक्त ताकीद दिली आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात 2014 पासून कुठल्याही विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात झालेली नाही. यामुळे तंत्रशिक्षण परिषद, यूजीसी, सीएसआयआर, डीएसटी, डीबीटी अशा अनेक केंद्र तथा राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत फेलोशीप प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीपचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिक्षण मंचद्वारा अनेक वेळा विद्यापीठाशी संपर्क साधण्यात आला व अनेक निवेदनांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. या वेळी मात्र तंत्रशिक्षण परिषदेने एक पाऊल पुढे टाकत सर्व पीएचडी विद्यार्थ्यांना इशारा देत त्यांची स्कॉलरशीप बंद करण्याचा सूचना दिली आहे. याकरिता 2018 या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना 18 ऑगस्ट 2020 तसेच 2019 च्या विद्यार्थ्यांसाठी 31 नोव्हेंबर 2020 या मुदतीपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्या फेलोशीप बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. 

विद्यापीठाकडे अनेकदा मागणी करूनही निर्णय न झाल्याने शिक्षण मंचने कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. शिक्षण मंचचे अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर यांनी याविषयाची तीव्रता कुलगुरूंच्या लक्षात आणून दिली. विद्यापीठाच्या कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थी भरडल्या जात असून त्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता कुलगुरूंनी परीक्षा विभागास आदेशित करून याप्रकरणी तत्काळ उचित कारवाई करावी आणि विनाविलंब संबंधित विद्यार्थ्यांना तात्पुरते तसेच सशर्त स्वरूपाचे पत्र प्रदान करावे, असे आदेशित केले. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT