Tehsildar cremated Parthiva in yavatmal 
विदर्भ

पंधरा तासांपासून मृतदेह होता पडून अन् नातेवाईकांनी फिरकूनही पाहिले नाही; मग मुखाग्नीसाठी तहसीलदार आले पुढे

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : कोरोनाने माणसाला जगणे शिकवले. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत, हे शिकवले. कोरोनाच्या लढ्यात मानवतेचा परिचय देणाऱ्या बऱ्याच घटना घडत आहेत. परंतु, माणुसकीला लाजवणाऱ्याही घटना घडत आहेत. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात घडली. कोरोनाने मरण पावलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांनी १५ तास तसाच ठेवला, पण त्याच्यावर अंत्यसंस्कार केला नाही.

पुसद येथे चौकीदारीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नंतर त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह तसाच राहू दिला. १५ तास उलटूनही अंत्यसंस्काराची तयारी केली नाही. ही बाब तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांना माहिती होताच त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः या व्यक्तीच्या मृतदेहाला मुखाग्नी दिली. तहसीलदार वाहुरवाघ यांनी केलेल्या या कामामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी मृतदेहाकडे पाठ फिरविल्यावरही त्यांनी अंत्यसंस्कार करून पुत्रकर्तव्य पार पाडले, असे सर्व लोक बोलत आहेत. हा मृत व्यक्ती खासगी चौकीदारी करून चरितार्थ चालवीत होता. त्याला श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने कोरोनाची चाचणी करून घेतली.

कुणाला कळविण्याचेही सौजन्य दाखविले नाही

तपासणीचा अहवाल येईपर्यंत सदर व्यक्ती गृहविलगीकरणातच होता. ज्या दिवशी तपासणी केली, त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हे माहिती झाल्यावर कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाकडे फिरकूनही पाहिले नाही किंवा इतर कुणाला कळविण्याचेही सौजन्य दाखविले नाही.

तहसीलदारांचे कौतुक

हा प्रकार तहसीलदार वाहुरवाघ यांना माहिती होताच त्यांनी पुढाकार घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मानवतेचे मोठे कार्य केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT