file photo 
विदर्भ

सांगा? वाढीव रक्कम कुठून आणणार?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव सभागृहातून मंजूर केला. यानंतर त्याचे श्रेय घेण्यातही पदाधिकारी आघाडीवर होते. मात्र, गुरुवारी राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर अतिरिक्त रक्कम कुठून आणणार, असा सवाल करीत वित्तीय आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यामुळे आठ हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांत सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनाबाबत शंका निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने सर्व महापालिका, नगर परिषदांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेने सभागृहातून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव मंजूर केला. हा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला. सप्टेंबरमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याबाबत कर्मचारी व अधिकाऱ्यांना अपेक्षा होती. महापालिकेनेही गुरुवारी पुन्हा राज्य सरकारकडे मेलद्वारे पत्र पाठविले. यावर नगरविकास विभागाने सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कार्यपद्धती ठरविल्याचे महापालिकेला कळविले. या कार्यपद्धतीनुसार पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोगानुसार वेतन पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.
राज्य सरकारने नव्या कार्यपद्धतीत अनेक अटी लादल्या आहेत. महासभेचा प्रस्ताव आयुक्तांच्या अभिप्रायासह सादर करावा, महापालिकेचे निव्वळ उत्पन्न, कर्ज, सरकारचे अनुदान, एकूण आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, कर्जावरील व्याज, विद्युत, पाणीपुरवठ्याची देयके आदी स्पष्टपणे प्रस्तावात नमूद करावे, असे नगरविकास विभागाने महापालिकेला म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT