Temperature
Temperature 
विदर्भ

नागपूरचा पारा ४३.२ अंशांवर

सकाळवृत्तसेवा

नागपूर - विदर्भात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना उन्हाचाही पारा चढला आहे. नागपूरचा पारा या मोसमात प्रथमच ४३.२ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रचाराच्या पदयात्रेतील उमेदवार आणि कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

एप्रिल आणि मे हे दोन महिने सर्वाधिक तापदायक मानले जातात. एप्रिल तोंडावर असल्यामुळे आता उन्हाची तीव्रताही दिवसेंदिवस वाढणार, हे अपेक्षित आहे. याचा अनुभव शुक्रवारी वैदर्भींना आला. नागपूरच्या पाऱ्याने चोवीस तासांत दोन अंशांनी उसळी घेत यंदाच्या उन्हाळ्यातील ४१.२ अंशांचा उच्चांक नोंदविला. शुक्रवारचा दिवस अकोलेकरांसाठीही त्रासदायक ठरला. येथे गुरुवारच्या तुलनेत पारा जवळपास दीड अंशांनी चढून ४३.२ अशांवर गेला. 

केवळ विदर्भातच नव्हे, संपूर्ण राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद येथे झाली. अमरावती येथेही पारा गेल्या तीन-चार दिवसांपासून उच्चांकीवर आहे. आजही येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 

विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा जोरदार कहर सुरू आहे. वर्धा व चंद्रपूर येथे ४२.० अंश सेल्सिअस, यवतमाळ येथे ४१.५ अंश सेल्सिअस, ब्रम्हपुरी येथे ४१.२ अंश सेल्सिअस आणि वाशीम येथे ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली.  

वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचे तीव्र चटके जाणवत असून, पंखे व कूलर्ससह एसीही सुरू झाले आहेत. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता असल्याने तापमानात खूप वाढ अपेक्षित नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT