molestaion 
विदर्भ

मंगल कार्यालयात घडले अमंगल! सफाई कामगाराने घातला १० वर्षाच्या चिमुकलीच्या अब्रुवर हात

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ :  विकृती कुठल्या थराला जाईल, ते सांगताच येत नाही. काळ, वेळ, वय काहीही न पाहता एका विकृताने छोट्या मुलीवर घाला घातल्याची घटना नुकतीच घडली.


यवतमाळ येथील दारव्हा रोड वरील एका हॉटेलमध्ये लग्न समारंभ होता . या लग्नात सहभागी होण्यासाठी आपल्या आईवडिलांसोबत एक 10 वर्षांची चिमुरडी आली होती. याच हॉटेलमधील एका सफाई कामगाराने या चिमुकलीला पकडून विनयभंग केला हा सर्व प्रकार CC Tv त कैद झाला आहे .

या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये तो साफसफाईचे काम करतो. खाऊचे आमिष दाखवून या नराधमाने तिला एकांतात नेले . तिथे त्याने तिचा विनयभंग केला . तिने हा प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला .

तात्काळ त्या विकृताला ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी CC Tv फुटेज आपल्या ताब्यात घेतले आहे . या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT