Tendupatta Compilation wages in Gadchiroli Case in Collectors Court
Tendupatta Compilation wages in Gadchiroli Case in Collectors Court 
विदर्भ

आठ करोड रुपये तेंदूपत्ता संकलन मजूरी देण्यास ठेकेदाराकडून टाळाटाळ ; प्रकरण जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात

मनोहर बोरकर

एटापल्ली (जि. गडचिरोली) - तालुक्यातील ग्रामपंचायत गट्टा, जांबिया, गर्देवाडा, वांगेतुरी व जवेली अशा पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील साठ गावातील नागरिकांचे आठ करोड अडतीस लाख 45 हजार 760 रुपयांची सन 2017 च्या हंगामातील तेंदूपत्ता संकलन मजूरी देण्यास स्नेहल ट्रेडिंग कंपनी गोंदिया टाळाटाळ करीत असल्याने जिल्हा परिषद सदस्य तथा ग्रामसभा अध्यक्ष सैनु गोटा, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय चरडुके, पंचायत समिती सदस्य शिला गोटा, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, मनोहर बोरकर व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धड़क देऊन मजूरांची मजूरी रक्कम मिळवून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. 

गट्टा, जांबिया, गर्देवाडा, वांगेतुरी व जवेली या पाचही ग्रामपंचायत अतिदुर्गम, मागास व नक्षल प्रभावी क्षेत्रातील असून परिसरातील साठ गावातील शेकडो मजूर नागरिकांनी सन 2017 मध्ये पेसा कायदानुसार स्थानिक ग्रामस्थरीय सहनियंत्रण समितीच्या माध्यमातून दिनांक 30 एप्रिल 2017 रोजी स्नेहल ट्रेडिंग कंपनी गोंदियाला आवश्यक लिलाव बोलीतून लिलाव मंजूर केला होता. त्यावेळी मजुरांनी चौदा करोड 67 लाख 94 हजार वीस रुपये महसुली किंमतीचा तेंदूपत्ता संकलन केले होते. त्यातील सहा करोड 29 लाख 48 हजार 260 रुपये स्नेहल कंपनीने दोन टप्प्यात अदा केले. मात्र त्यानंतर एक वर्षाचा कालावधी होऊनही दोन किस्तीत द्यावयाची रक्कम आठ करोड 38 लाख 45 हजार 760 रुपये देण्यास कंपनी ताळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या भागातील मजूरांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरीत परिमाण झाला असून विवाह योग्य तरुण तरुणींचे जुळलेले लग्न पैसा अभावी तोडल्या गेले उपजीविका व आजारपनात दुकानदार व नातेवाहिकांकडून घेतलेली उधार-उसनवार परतफेड करने कठिन झाले.

तसेच आज आमच्या शेकडो कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे सदर मजूरांची थकीत तेंदूपत्ता महसूली रक्कम ठेकेदार स्नेहल ट्रेडिंग कंपनी गोंदिया यांचे कडून मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा, संजय चरडुके, पंचायत समिति सदस्य शिला गोटा, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, मनोहर बोरकर, उलगे तिम्मा, मंगेश नरोटे, प्रशांत गोटा, तानाजी दूर्वा, प्रभाकर कुकटलावार व नागरिकांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT