terrible accident on mumbai nagpur highway three people from chalisgaon killed 2 seriously injured esakal
विदर्भ

मुंबई - नागपूर महामार्गावर भीषण अपघात; चाळीसगावचे तिघे ठार, २ गंभीर

सकाळ डिजिटल टीम

बुलढाणा : आज पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर महामार्गावर मेहकर शहराजवळ असलेल्या गजानन महाराज मंदिरा जवळ एक अल्टो कार व लक्झरी बसचा समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात कार मधील तीन जण जागीच ठार झालेत तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आलेआहे. अपघात इतका भीषण होता की धडक होताच कार ही लक्झरी बस मध्ये अडकली होती. त्यामुळे कारमधील जखमींना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्याने तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कारमधील पाच जण हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातील आहेत.

मृतकांची ओळख पटली असून सर्वजण चाळीसगाव येथील आहेत. इंदल चव्हान (वय 38), योगेश विसपुते (वय 32), विषाल विसपुते (वय 38) अशी त्यांची नावे आहेत. तर जखमी असलेले दोघांमध्ये ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण (वय 32), मिथुन रमेश चव्हान (वय 17) या दोघांचा समावेश आहे , जखमींची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान लक्झरी बस पुण्याहून नागपूर कडे जात होती, तर कार नागपूर कडून मेहकरकडे येत असताना भल्या पहाटे हा अपघात घडला, अपघातानंतर तात्काळ मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत पोहोचविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT