tet exam sakal media
विदर्भ

ब्लू-टूथ लावून सोडविला टीईटीचा पेपर

संत तुकाराम हायस्कूल केंद्रातील प्रकार; परीक्षार्थ्यांनीच पकडले विद्यार्थिनीला

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : टी. बी. टोली गोंदिया येथील संत तुकाराम हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीने चक्क ब्लू-टूथ कानाला लावून टीईटीचा पेपर सोडविल्याचे समोर आले आहे. हा प्रकार खुद्द परीक्षार्थी विद्यार्थिनीनेच उजेडात आणला. आता त्या हायटेक काॅपी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.

टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आज, रविवारी राज्यभरात घेण्यात आली. गोंदियातही या परीक्षेला बहुतांश विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मात्र, संत तुकाराम हायस्कूलच्या केंद्रात घडलेल्या या प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या केंद्रातील खोली क्रमांक पाचमध्ये एका विद्यार्थिनीने ब्लू-टूथ कानाला लावून पेपर सोडविला. सकाळी १०.३० ते दुपारी एकपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. संबंधित विद्यार्थिनी समोरच्या बाकावर होती. पेपरची वेळ पूर्ण होईपर्यंत हा प्रकार लक्षात आला नाही. नंतर मात्र, एका परीक्षार्थी विद्यार्थिनीला तिच्या कानाला ब्लू-टूथ लावल्याचे निदर्शनास येताच तिने या प्रकाराची तक्रार संबंधित मुख्याध्यापकाकडे केली. मुख्याध्यापकाने ब्लू-टूथ जप्त करीत संबंधित विद्यार्थिनीला परीक्षेपासून निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. पीडित विद्यार्थिनीने ब्लू-टूथ जवळ बाळगला, मात्र वापर केला नसल्याचे सांगितल्याचे तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

ही उपकरणे आत गेलीच कशी

परीक्षा केंद्रात मोबाईल, ब्लू-टूथ व अन्य इलेक्ट्रीक उपकरणे नेण्याची परवानगी नसते. मग या विद्यार्थिनीजवळ ब्लू-टूथ आलाच कसा, परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी झाली किंवा नाही, हा प्रश्न कायम आहे. या प्रकाराची मात्र चांगलीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

Mumbai: दत्तक प्रक्रियेवर निर्णय देण्यास जिल्हाधिकारीही सक्षम, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

Maharashtra Forest Land: राज्य सरकारचा निर्णय! वनजमिनींच्या नोंदी अद्ययावत होणार, प्रकल्पांना मिळणार गती, जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश..

Parbhani News: केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो;परभणीच्या फळबाजारात आंब्याच्या दरात घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT