Textbooks will now be reused 
विदर्भ

सरकारचा पथदर्शी प्रकल्प; आता पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर, प्रतिसाद बघून पुढील निर्णय

संदीप रायपुरे

वर्धा : राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून (२०२१) या प्रयोगाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांनी योग्यरितीने जपणूक केलेली व सुस्थितीत ठेवलेल्या पुस्तकांचे संकलन होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागणार आहे.

शालेय अभ्यासक्रमांमध्ये पर्यावरण या विषयात पुनर्वापर या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याच धर्तीवर पुस्तकांचा पुनर्वापर ही संकल्पना पुढे आली आहे. सरकारकडून दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातात.

या कामासाठी २०० कोटीपर्यंत खर्च येतो. पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर केल्यास काही प्रमाणात कागदाची बचत होऊ शकते. अशा पाठ्यपुस्तकाचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी त्याचे फेरवाटप करणे शक्‍य होईल.

ज्या शाळेत मोफत पाठ्यपुस्तके योजना राबवली जाते. तेथील मुलांनी वापरलेली पुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन सरकारने केले आहे. ही योजना ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांना कुठलेही बंधन असणार नाही. कोरोना प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी हा उपक्रम राबविण्यात यावा.

पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर

पाठ्यपुस्तके जमा झाल्यानंतर सदर पुस्तकांची वर्गवारी शाळास्तरावर करण्यात यावी व त्याचा अहवाल संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावा. या उपक्रमातून किती पाठ्यपुस्तके जमा होतील तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा प्रतिसाद बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT