file photo 
विदर्भ

महिलेला वाचविण्यासाठी ठाणेदाराची नदीत उडी

सकाळ वृत्तसेवा

देसाईगंज (जि. गडचिरोली) : ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून एका महिलेने आज, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उडी घेतली. देसाईगंज पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप लांडे यांनी जिवाची पर्वा न करता महिलेला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांना महिलेपर्यंत पोहोचताच आले नाही.
देसाईगंज ते ब्रह्मपुरीकडे मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही लोकांना सकाळी वैनगंगा नदीवरील पुलावर एक महिला खूप वेळपासून बसून असलेली दिसली. अनेकांना तिच्याबद्दल शंकासुद्धा आली. परंतु, कदाचित ती नदीवर फिरण्यासाठी आली असावी, असे समजून कोणीही तिची चौकशी केली नाही. आणि काही वेळातच त्या महिलेने पुलावरून नदीत उडी घेतली. तिला उडी घेताना काही लोकांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड केली. लगेच देसाईगंज पोलिसांना माहिती दिली.
देसाईगंज ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप लांडे यांच्यासह ताफा घटनास्थळी आला. पोलिसांनी तत्काळ महिलेचा शोध सुरू केला. परंतु, काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीला प्रवाह वेगवान होता. त्यामुळे महिलेचा शोध घेणे कठीण झाले. देसाईगंज पोलिसांकडे असलेल्या बोटीच्या साहाय्याने महिलेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ठाणेदार लांडे यांनी कोंढाळा गावातील वाळूघाटाच्या मार्गावरून थेट नदीपात्र गाठले. इतक्‍यात त्यांना वाहून जाणारी महिला दिसली.
लांडे यांनी जिवाची पर्वा न करता थेट नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्रातील खोल पाण्यात त्या महिलेचा एक ते दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. परंतु, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने व जवळ इतर कोणीही सहकारी नसल्याने त्यांना एकदम खोलवर पाण्यात जाता आले नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत ती महिला वाहून गेली. देसाईगंज पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Gudi Padwa Special Sugar-Free Dates Shrikhand: गुढी पाडव्याला मधुमेहीदेखील खाऊ शकतील श्रीखंड; खजूर श्रीखंडाची रेसिपी लगेच वाचा

SCROLL FOR NEXT