Mobile tower Sakal
विदर्भ

यवतमाळ : मोबाईल टाॅवरवरच रात्रभर मुक्काम

अन्यायग्रस्त वडिलाची व्यथा ; मुलाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

रावणवाडी - मुलाचा अपघाती मृत्यू नाही, तर त्याचा खून करण्यात आला. तशी तक्रार पोलिसांत करूनही पोलिस कारवाई करीत नाही. त्यामुळे त्रस्त वासुदेव रामू तावाडे (वय ५५, रा. खातिया) हे गुरुवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास खातिया येथील मोबाईल टाॅवरवर चढले. रात्रभर ते टाॅवरवरच होते. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत टाॅवरवरून उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. अखेर शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आश्वासनानंतर ते टाॅवरवरून खाली उतरले.

वासुदेव तावाडे यांचा मुलगा गोपाल याचा २०२१ मध्ये एका दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दर्शविण्यात आले. परंतु, अपघाती मृत्यू नसून, त्याला ठार मारण्यात आले, असा आरोप करीत वासुदेव तावाडे यांनी तशी तक्रार पोलिस ठाण्यात केली. परंतु, पोलिसांकडून व्यवस्थित तपास केला गेला नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. या घटनेची योग्य चाैकशी व्हावी, अशी विनवणी करूनही पोलिस कुठलीही कार्यवाही करीत नाही, असा आरोप तावाडे यांनी केला. एवढेच नव्हे, तर कर्जमाफी होऊनही नावावर कर्ज दाखविले जात आहे. यातही अन्याय झाला आहे, असा आरोपही त्यांचा आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये प्रशासकीय यंत्रणा न्याय देत नसल्याने त्रस्त वासुदेव तावाडे यांनी गुरुवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गावातील मोबाईल टाॅवरवर चढून विरुगिरी केली. या घटनेची माहिती होताच पोलिस, फायर आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी त्यांना टाॅवरवरून उतरण्याची विनंती केली तरी, गुरुवारी रात्रभर टाॅवरवरून ते खाली उतरले नाही. त्यांनी रात्रभर टाॅवरवरच मुक्काम ठोकला. त्यांच्याकरिता अन्नपाणी त्यांचे नातेवाईक पोहोचवून देत होते. अखेर आज, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते खाली उतरले.

तहसीलदारांचे आश्वासन

तहसीलदार पालांदूरकर यांनी वासुदेव तावाडे यांना दोन्ही समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने वासुदेव तावाडे यांनी टाॅवरवरून उतरण्याची भूमिका घेतली. अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते डाॅवरवरून खाली उतरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT