Accident News sakal
विदर्भ

Accident News : एअरबॅग उघडल्याने कारमधील दाम्पत्य बचावले

वणी येथे घरी आलेल्या पाहुण्यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सोडून परत येत असताना कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील समोरील दोन्ही एअर बॅग उघडल्याने दांपत्य सुदैवाने सुखरूप बचावले.

सकाळ वृत्तसेवा

शिंदोला (जि. यवतमाळ) : वणी येथे घरी आलेल्या पाहुण्यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सोडून परत येत असताना कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील समोरील दोन्ही एअर बॅग उघडल्याने दांपत्य सुदैवाने सुखरूप बचावले. हा अपघात नांदेपेरा मार्गावर नगराळे यांच्या दवाखान्यासमोर शनिवारी (ता. २४) पहाटे चार वाजतादरम्यान घडला.

येथील साई मंदिर चौकात मणीप्रभा टॉवर कॉम्पलेक्समधील रहिवासी आशीष झामड व त्यांची वहिनी आणि पुतण्याला रेल्वेत बसविण्यासाठी शुक्रवारी (ता. २३) रात्री १२ वाजता सियाझ कारने बल्लारशाहसाठी निघाले होते.

यावेळी आशीष यांच्या सोबत त्याची पत्नी अभिलाषा होती. वहिनीला बल्लारशाह येथे रेल्वेत बसवून झामड दांपत्य शनिवारी (ता. २४) रात्री तीन वाजता परत निघाले. पहाटे चार वाजतादरम्यान वणीपर्यंत ते सुखरूप आले.

मात्र आपल्या घरापासून अंदाजे १०० मीटर आधीच डॉ. नगराळे यांच्या दवाखान्यासमोर कारचालक आशीष झामड यांचे कारवरून नियंत्रण सुटले आणि कार दुसऱ्या बाजूला भाजी दुकानासमोर इलेक्ट्रिक खांबावर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की सिमेंटचा खांब गाडीचा बोनट चिरून आत घुसला. धडक बसताच कारमधील दोन्ही एअर बॅग उघडल्या. त्यामुळे कारचालक आशीष आणि त्यांची पत्नीला फक्त किरकोळ इजा झाली. घटनेबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT