Post wedding shoot 
विदर्भ

Post wedding shoot : प्री-वेडिंग पडलं मागे! शहरात पोस्ट वेडिंग शुटचा नवा ‘ट्रेंड'; लोकेशन्स बुक

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पूर्वी केवळ लग्न आणि त्यापूर्वीच्या हळद, सीमंती अशा विधींपासून ते पाठवणीपर्यंत व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफीचे पॅकेज असायचे. यामध्ये एक मुख्य फोटोग्राफर व त्याच्या सहाय्यासाठी एक-दोन जण इतकाच त्यांचा ग्रुप असायचा.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ही पद्धत मात्र कालबाह्य ठरली आहे. केवळ लग्नापुरताच फोटोग्राफर आता राहिला नसून, लग्नाच्या इव्हेंटमधला तो एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. त्यात नवनवीन ट्रेंड येत असल्याने त्यांच्या हाताला रोजगार मिळत असताना प्रि-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंडनंतर आता तरुण जोडपी लग्न झाल्यावर फोटो शूट करून घेण्याला प्राधान्य देत आहेत.

लोकेशन्संचेही बुकिंग

लग्नानंतरच्या फोटो थीम, लोकेशन आणि वेशभूषा ठरविण्याचे कामही होत आहे, त्यांना हव्या त्या लोकेशची रीतसर परवानगी घेऊन आणि हव्या त्या थीमनुसार फोटोशुटसह व्हिडिओ शूट करून दिला जात आहे. उपराजधानीसह विदर्भासह मध्य प्रदेशातील काही लोकेशन्सला पसंती दिली जात आहे.

लग्नाचा सुंदर क्षण अविस्मरणीय करण्याची प्रत्येक जोडप्यांची इच्छा असते. प्री आणि पोस्ट वेडिंग शूट हा त्यातलाच एक प्रकार. जान्हवी आणि अमन यांनी चक्क लग्नानंतर फोटोशूट करण्यावर भर थीमवर त्यांच्या लव्हस्टोरीवर आधारित थीमवर त्यांनी हे फोटोशूट करून घेतले. सोशल मीडियावर ही छायाचित्रे शेअर करताच त्यावर लाईक्सचा वर्षाव झाला...त्यातूनच दिसली पोस्ट वेडिंग फोटोशूटची किमया.

थीमला आहे महत्त्व

सध्या जान्हवी आणि अमनप्रमाणे अनेक तरुण जोडपी प्री-वेडिंग शुटस करण्यापेक्षा लग्नानंतर फोटोशूट करून घेण्याकडे, म्हणजेच पोस्ट वेडिंग फोटोशूट करण्याला प्राधान्य देत आहेत. वेगवेगळ्या लोकेशन्सवर आणि वेगवेगळ्या थीमनुसार ते फोटोशूट करत आहेत. त्यासाठी विशिष्ट फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर नियुक्‍त केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळाले आहे.

लग्नाचे विधी, पाहुणे मंडळींचे स्वागत, वर-वधूंच्या विधींचे फोटो, मेंदी, संगीत व इतर काही पारंपरिक विधी, त्यांचे ‘कॅन्डीड’ क्षण, व्हिडीओ शूटिंग असे सर्व फोटोज व्यवस्थित मिळावेत यासाठी ही टीम केवळ लग्नाच्या दिवशीच नव्हे, तर त्यापूर्वीच्या प्रत्येक इव्हेंटला वर-वधूसोबत असते. हे तर झाले लग्नाचे. परंतु, लग्न ठरल्यानंतर आता कपल्सची पहिली पसंती असते ती प्री-वेडिंग आणि पोस्ट वेडिंग फोटोशूटला.

प्रि वेडिंग शुटसोबत आता पोस्ट वेडिंग शुटची मागणी वाढली आहे. नागपूरच्या आजूबाजूला रामटेक, घोगरा महादेवसह मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही याचे शूट करण्यात येते. त्याचे दरही जागेनुसार ठरत असून ५० हजारांपासून ते पाच लाखापर्यंतचा खर्च करण्याची तयारी अनेकांची असते. यासोबत बेबी शॉवरचेही फोटोशुट करण्यावर भर दिला जात आहे.

- महेश टिकले, व्यावसायिक फोटोग्राफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई-पुणे महामार्गावरील बोर घाटात अवजड वाहनांना बंदी

Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

SCROLL FOR NEXT