Wardha crime  sakal
विदर्भ

Wardha Crime : मुलाने केला वडिलांचा खून;वर्धा नदीच्या पात्रालगत मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर नमस्कारी येथील बाबाराव महादेव पारिसे (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आला होता. वडिलांच्या अंगावर जखमा असल्याने या प्रकरणी मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला.

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव (शा.पंत) (जि. वर्धा) : आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर नमस्कारी येथील बाबाराव महादेव पारिसे (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आला होता. वडिलांच्या अंगावर जखमा असल्याने या प्रकरणी मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. यात तक्रारदार मुलाने त्याच्या साळ्याच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी मुलगा नागोराव बाबाराव पारीसे (वय ३४) तसेच त्याचा साळा विलास आनंद केवदे (वय २८) रा. वासनी ता.अचलपूर ह. मू. नमस्कारी या दोघांना ताब्यात घेतले आहे. मुलाच्या आणि साळ्याच्या पत्नीवर वाईट नजर असल्याने सख्या बापाचा खून केल्याचा खुलासा पोलिसांसमोर केला. या कारणातून त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याचेही त्याने सांगितले. या दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. आष्टी तालुक्यातील भारसवाडा येथील बाजार असल्याने येथे लगतच्या नमस्करी गावातील नागरिक येतात. त्या बाजाराला बाबाराव पारिसे आले होते. घरून बाजारात जाताता मोबाईल रिचार्ज करण्याचे कारण करून ते बाहेर पडले होते. त्याच बाजारातून बाबाराव यांचा मुलगा नागोराव परत आला. त्याने आईला वडील कुठे असल्याचे विचारले असता ते बाजारात गेल्याचे सांगितले. बाराच वेळ झाला तरी ते परत आले नसल्याने नगोराव नातलगासह त्यांच्या शोधात निघाला.

त्यावेळी बाबाराव रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. ही घटना २७ मे २०२४ रोजी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तब्बल पंधरा दिवसाच्या तपासानंतर खुनाचा गुन्हा उघड झाला. प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव, तळेगावचे ठाणेदार संदीप धोबे, निखिल काळे, अतुल अडसड, बालाजी म्हस्के, रूपेश उगेमुगे यांनी केला आहे.

रक्ताच्या डागांनी फुटले बिंग

अटक असलेल्या दोन्ही आरोपींना खून करण्याकरिता दुचाकीसही कुऱ्हाड आणि धारदार ब्लेडचा वापर केला. खून करून दुचाकीने घरी परत जात असताना दोघांनीही खुनाचे बिंग फुटू नये याकरिता विशेष काळजी घेतली होती. परंतु, त्याच्या दुचाकीवर पोलिसांना रक्ताचे डाग दिसले. त्याचा अहवाल आल्यानंतर मुलानेच वडिलांचा खून केल्याचे पुढे आले. पोलिसांनी गुन्ह्यांमधील संशयित आरोपींच्या घरून जप्त केलेला मुद्देमाल सी. ए.परीक्षण करिता न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळेत पाठविला. त्या अहवालावरून खूनाचा उलगडा झाला.

गळा आवळून केले ब्लेडने वार

नागोराव पारीसे आणि त्याचा साळा विलास केवदे या दोघांनी मिळून पहिले बाबाराव पारिसे यांचा गळा आवळला व नंतर छोट्या धारदार ब्लेडने गळ्यावर वार केले. त्यानंतर कुऱ्हाडीने बाबाराव यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्यांना जागीच ठार केल्याचे पोलिसांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT