police arrested theft.jpg 
विदर्भ

जालन्याची चोरीची कार नंबर प्लेट बदलून विकत होता; मात्र फसला डाव

सकाळ वृत्तसेवा

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : जालना जिल्ह्यातून चोरून आणलेल्या आठ लाख रुपये किमतीच्या कारचे नंबर प्लेट बदलून विकण्याच्या प्रयत्नात असलेला अट्टल कार चोरटा 26 जानेवारीला स्थानिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

बुलडाणा तालुक्यातील करडी धाड येथील शेख नदीम शेख दाऊद (वय 23) असे सदर आरोपीचे नाव असून जालना जिल्ह्यातून आठ लाख रुपये किमतीचे स्विफ्ट डिझायर क्रमांक एम. एच. 21 ए एक्स 1645 कार चोरून त्यावर एम एच 22 सी 111 नंबरची बनावट प्लेट लावून शहरातील संजय नगर भागात संशयितरीत्या फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

यांनी राबविले सर्चिंग ऑपरेशन
या माहितीच्या आधारावर सदर कारवाईबाबत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी बी. एन. नलावडे, ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव मुळे, सर्जेराव तौर, पोलिस नाईक विजय किटे, तुळशीदास गुंजकर, नितीन जाधव, शिवाजी बिलगे, विजय गीते, गजानन भराड यांनी संजय नगर भागात सर्चिंग ऑपरेशन केले.

कार थांबताच काढला पळ
यावेळी बनावट नंबर प्लेट लावलेली स्विफ्ट डिझायर ही पांढऱ्या रंगाची कार समोरुन येताना दिसली. पोलिसांनी सदर कार थांबवून कार चालकास बाहेर येण्याचे सांगितले असता कार खाली उतरून त्याने पळ काढला. यावेळी पोलिस नाईक विजय किटे व तुळशीदास गुंजकर यांनी पाठलाग करून त्यास पकडले असता त्याने आपले नाव शेख नदीम शेख दाऊद सांगितले. सदर कार बाबत जालना जिल्ह्यातील चंदनझीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.

अनेक महागड्या कार चोरून विकल्याची माहिती
कार व चोरट्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास केला असता त्याने यापूर्वी अनेक महागड्या कार चोरून विकल्याची माहिती समोर आली. सदर कार विकण्यासाठीच तो देऊळगाव राजा परिसरात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याबाबत चंदनझीरा (जिल्हा जालना) पोलिसांशी संपर्क करून स्थानिक पोलिसांनी आरोपी व चोरून आणलेली कार एडीएस स्कॉटच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT