Theft at the house of former mayor of Tivasa in Amravati district
Theft at the house of former mayor of Tivasa in Amravati district 
विदर्भ

अमरावती जिल्ह्यतील तिवस्याचे माजी नगराध्यक्षांच्या घरी चोरी; रक्कम केली लंपास

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे भाडेतत्वावर राहत असलेल्या येथील पंचवटी चौका लागत असलेल्या घरी मध्यरात्री चोरट्यांनी हात साफ करीत पंचवीस हजार रोख रकम व इतर वस्तू लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उशिरा उघडकीस आली. शहराच्या पंचवटी चौकात पोलिसांची नेहमीच गस्त असताना सुद्धा चोरीची घटना घडल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या आठवड्याभऱ्या आधी वैभव वानखडे यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांच्या दुसऱ्या घरी दसव्याच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याने सहकुटुंब पंचवटी येथील घराला ताडे ठोकून वडिलांच्या घरी मुक्कामी होते. याचाच फायदा घेत भुरट्या चोरट्यांनी वानखडे यांच्या घराला लक्ष केले. शहराच्या पंचवटी चौक ते कुऱ्हा मार्ग लागतच वैभव वानखेडे यांचे घर आहे. 

मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास काही चोरट्यांनी मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून रोख रक्कम पंचवीस हजार, एक अंगठी व गोप यासह विहिरीतील मोटर पंप चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. पुढील तपास पोलिस करीत आहे.

डॉगस्कॉट मार्फत चोरट्यांचा शोध

शहराच्या माजी नगराध्यक्षांच्या घरी चोरी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. पंचवटी चौकात नेहमीच काळोखा अंधार राहत असल्याने याचा फायदा चोरट्यांना झाला. वानखडे यांचे घर अगदी रस्त्या लागत आहे. चौकापासून तर कुऱ्हा मार्गावर असलेले समर्थ लॉन, मॅजिक बार, यासह इतर काही ठिकाणच्या सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. मात्र, काहीच हालचाली यामध्ये दिसून आल्या नाही. डॉगस्कॉट मार्फत चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT