विदर्भ

चोराची शक्कल! सीसीटीव्हाला पेंट मारून मंदिराची दानपेटी फोडली

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : मध्यरात्री तो मंदिरात पोहोचला. सीसीटीव्हीमध्ये आपले दृश्य टिपले जाऊ नये म्हणून सीसीटीव्हीवर पेंट लेपला. मग काय त्याने मंदिराची दानपेटी फोडली अन् रक्कम घेऊन पसार झाला. ठाणेदार सुशील धोपटे यांनी तपासाची चक्र फिरवीत आरोपीला ताब्यात घेतले. विदर्भ तेलंगणातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसंत कोडय्या महाराज देवस्थान संस्थानात ही घटना समोर आली.

कोरोनाच्या सावटात अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यामुळे अलीकडे चोरीच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यात चार दिवसांत गोंडपिपरीतील एचपी गॅस, भंगारात तळोधी येथील आईंचवार येथे चोऱ्या झाल्यात. सोबतच पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. तालुक्यातील धाबा येथे श्री. संत कोंडय्या महाराज देवस्थान आहे. शेगमवार हे येथे पुजारी म्हणून कामकाज सांभाळतात.

पुजारी सकाळी पूजेसाठी मंदिरात गेले. यावेळी त्यांना सीसीटीव्हीवर पेंट फासल्याचे आढळले. सोबतच मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम पळविल्याचा प्रकार लक्षात आला. संस्थेचे अध्यक्ष अमर बोडलावार यांना घटनेची माहिती देण्यात आली. याप्रकरणाची तक्रार धाबा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली.

ठाणेदार सुशील धोपटे यांनी अतिशय वेगाने तपासाची चक्र फिरवीत आरोपी श्रेयस दुर्गे याला ताब्यात घेतले. वर्षभरात धाब्यातील मंदिरातील चोरीची ही पाचवी घटना आहे. वडिलांची तब्येत खराब असल्याने उपचारासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे आपण दानपेटी फोडून रक्कम चोरल्याची कबुली आरोपीने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT