fake currency 
विदर्भ

हिंगोली शहरातील बनावट नोटांचे धागेदोरे पुसदमध्ये; मोठे मासे गळाला लागणार 

रवींद्र शिंदे

पुसद (जि. यवतमाळ) : मराठवाड्यातील हिंगोली शहराजवळ असलेल्या आनंदनगर भागातील बनावट नोटांच्या प्रकरणाचा दहशतवादविरोधी पथकाने छडा लावल्यानंतर आता विदर्भातील पुसद येथून गुरुवारी (ता.४) पहाटे दोन जणांना अटक करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून विदर्भातही बनावट नोटा चलनात आणल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे. बनावट नोटा प्रकरणात आणखी काही मोठी मासे गळाला लागतील, असा पोलिसांचा कयास आहे.

हिंगोली शहरालगत आनंदनगर भागात बनावट नोटा छापणाऱ्या संशयित संतोष सूर्यवंशी-देशमुख व छाया भुक्तार या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये पुसद येथील दोघे जण त्यांच्या सोबत काम करीत असल्याची माहिती पुढे आली.

हिंगोलीचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रामेश्‍वर वैंजने, सहायक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार रूपेश धाबे, महेश बंडे, अर्जून पडघन, विजय घुगे यांच्या पथकाने बुधवारी (ता.३) मध्यरात्री पुसद येथे येऊन शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास शेख इम्रान व विजय कुरुडे (दोन्ही रा. पुसद) यांना अटक केली. 

दरम्यान, वरील दोघेही संशयित संतोष सूर्यवंशी याच्या तीन वर्षापासून संपर्कात होते. तीन वर्षांपासून ते बनावट नोटा घेऊन विदर्भात चलनामध्ये आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुसद येथे आणखी काही जणांना नोटा दिल्या काय, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तर यामध्ये आणखी काही जण सहभागी असून, त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. पुसद पोलिसांना मात्र, याची या पथकाने कुठलीही माहिती दिली नसल्याचे वसंतनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रदीप परदेशी यांनी 'सकाळ'ला सांगितले.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

Dilip Walse Patil : 'अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११० कोटींचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणार' – माजी गृहमंत्री वळसे पाटील!

Nanded News : नववर्ष २०२६ स्वागतासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचे आवाहन; सिंदखेड पोलीस सक्रिय!

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

SCROLL FOR NEXT