अमरावती : कोरोनाचा (coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. या आवाहनानंतर लसीकरण केंद्रावरील गर्दी (Crowd at the vaccination center) वाढत आहे. कुठे पहिला तर कुठे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक पहाटे पाच वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर दाखल झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. (there is a crowd for vaccination from 5 in the morning in Amravati)
जिल्ह्यात लशीचे (कोवीशिल्ड) २७ हजार डोस प्राप्त झाल्याने शहरासह ग्रामीण भागात काही लसीकरण केंद्र वाढविली. परंतु, ज्येष्ठ नागरिकांपैकी अनेकांना पहिला डोस महिनाभरापूर्वी दिला गेला. तीन ते चार दिवस जिल्ह्यात व्हॅक्सिनचा पुरवठा नसल्यामुळे नागरिक लस केव्हा येईल, असे विचारून परत जात होते. लशींचा साठा उपलब्ध झाल्याचे कळताच अनेकांनी प्रामुख्याने शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात समोरच्या परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व खापर्डे बगीचा मार्गावरील आरोग्य विभागाच्या प्रशिक्षणालय येथे लसीकरण केंद्राकडे धाव घेतली.
येथे कोवीशिल्डचा साठा आला. त्यामुळे या दोन्ही केंद्रांवर सकाळी दहापासून लसीकरणास सुरुवात झाली. केंद्रावरून कोवीशिल्ड की कोव्हॅक्सिन दिली जाईल, याबाबत माहिती नसल्यामुळे अनेकांनी गर्दी केली. दोन्ही केंद्रांवर पहाटे पाचपासून रांगा लागल्या तरी दोनपैकी कोणता साठा आहे, याबाबत अधिकृत माहिती नागरिकांना मिळत नव्हती. त्यामुळे गर्दी कायम दिसली.
दोन्ही केंद्रांवर कोवीशिल्ड असल्याचे जाहीर झाल्यानंतर मोजकेच लोक येथे थांबले. ज्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस हवा होता ते मात्र निराश होऊन परतले. इर्विनच्या प्रशिक्षणालयाच्या केंद्रावर कोव्हॅक्सिन मिळेल, असे पत्र सकाळी नऊ वाजेपर्यंत भिंतीवर चिकटविलेले होते. परंतु, फक्त कोवीशिल्डच मिळेल असे जाहीर झाल्यानंतर ते पत्र येथील कर्मचाऱ्याने फाडले. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमध्ये तारांबळ उडाली. अनेकांनी येथील कर्मचाऱ्यांनाच धारेवर धरले.
साठ्याबाबत संभ्रम कायम
कोव्हॅक्सिनचा साठा केव्हा येईल, याबाबत दोन्ही केंद्रांवर उपस्थित कर्मचारी, डॉक्टर, निश्चित कारण सांगू शकत नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम होता.
सोशल डिस्टन्सिंग वाऱ्यावर
शहरातील दोन्ही मोठ्या केंद्रांवर पहाटे पाचपासूनच रांगा लागायला सुरुवात झाली. काही वेळेतच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळताना कुणीच दिसत नव्हते. त्यामुळे अशी गर्दीसुद्धा घातक ठरण्याची भीती निर्माण झाली.
(there is a crowd for vaccination from 5 in the morning in Amravati)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.