wagh 
विदर्भ

या सरकारच्या काळात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर : चित्रा वाघ

सिद्धार्थ गोसावी

कोरपना (चंद्रपूर) : एकीकडे मोदी सरकार बेटी बचाओचा नारा देत आहे तर दुसरीकडे त्यांचे आमदार बेटी भगावोसाठी आग्रही आहेत, अशा सरकारकडून महिलांनी काय अपेक्षा करायची. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली असून महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांचे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे, स्वस्त धान्यापासून ते सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत वाढ केली असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. निमकरांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असून कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामला लागण्याचे आव्हान केले.

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनिस शासनाची ध्येय धोरणे सामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत, परंतु त्यांना कमी मानधनावर काम करावे लागत आहे. त्यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. सॅनिटरी पॅड वरील जीएसटी हटविण्याचे काम राष्ट्रवादीने केले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनिस, अशा वर्कर यांच्यासोबत संवाद साधला.

कोरपना तालुका व गडचांदूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित महिला मेळावा व बचत गटांना मार्गदर्शन कार्यक्रम (ता. 4) गडचांदूर येथील लक्ष्मी टॉकीज सभागृहात आयोजित केला होता. यावेळी माजी आमदार निमकर यांनी महिलांच्या समस्या बद्दल हे सरकार बेदखल असून महिला सबलीकरणांच्या नावावर जाहिरातबाजी करीत असल्याचे सांगितले.

यावेळी माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस रा. का. पा. सुदर्शन निमकर, राजुरा विधानसभा निरीक्षक तथा नागपूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बंडूभाऊ उमरकर, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, दीपक जयस्वाल, ज्योतिताई रंगारी, गडचांदूर नगर परिषद अध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, राजुरा विधानसभा अध्यक्ष तथा  गडचांदूर नगर परिषद गटनेता निलेश ताजणे, गडचांदूर नगर परिषद सदस्य सुरेखाताई गोरे, शांताताई मोतेवाड, शरद जोगी, अरुण डोहे ,हाफिज भाई, कोरपना तालुका अध्यक्ष अड. दिपाली मंथनवार, राजुरा महिला तालुका अध्यक्षा चंद्रकला रणदिवे, राजुरा शहर महिला अध्यक्ष लताताई ठाकरे, गडचांदूर शहर अध्यक्षा मायाताई मेश्राम,अशोक डोहे, अमोल आसेकर,पुरुषोत्तम अस्वले, मनीषा चुनारकर,प्रेमदास मेश्राम,रफीक निज़ामी, प्रतीक सदमपवार, पांडुरंग पिदुरकर, अजीम बेग, उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन दिपाली मंथनवार यांनी केले तर आभार शांताबाई मोतेेवाड यांनी मानले. यावेळी कोरपना तालुक्यातील हजारो महिलांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT