polic halla 
विदर्भ

फेसबुकवर झाली होती मैत्री अन् त्यानंतर त्या दोन्ही मुलींसोबत घडले असे

सकाळ वृत्तसेवा

पातूर (जि. अकोला) : पातूर तालुक्यातील दिग्रस विवरा व पातूर येथील तीन बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यास पातूर पोलिसांना यश आले असून, या मुली फेसबुक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या संपर्कात आल्याने ह्या घटना घडल्या आहे.

पालकांनी आपल्या पाल्यांबद्दल जागरूक राहावे
शहरासह तालुक्यातील दिग्रस, विवरा येथील बेपत्ता झालेल्या मुलींना शोधण्याठी पातूर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांन यश आले असून, तिन्ही मुलींना पालकांच्या ताब्यात दिले आहे. यापैकी फेसबुकवर मैत्री झालेली एक तरुणी विवाहबंधनात अडकली असून एका मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, पातूर येथील एक तरुणी अल्पवयीन असल्यामुळे फूस लावून पळवणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला तिच्या पालकाकडे सुपूर्द केले आहे. वाढत चाललेल्या घटना अत्यंत गंभीर असून, पालकांनी आपल्या मुला-मुलींकडे आवश्यकतेनुसार मोबाईल वापरासाठी द्यावा. आतापर्यंतच्या घडलेल्या अशा घटना जास्तीत जास्त मोबाईलच्या संपर्कामुळे घडल्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. याला पालकच पायबंद घालू शकतात. यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांबद्दल जागरूक राहावे असे आवाहन यावेळी पातुरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Mini Goa: चक्क यूपीतच आहे 'मिनी गोवा'! कॅम्पिंग, जंगल सफारी अन् कैंची धामची शांती; 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT