56bc83ef-ee3b-44d4-bd38-e114201fa72b.jpg 
विदर्भ

लैंगिक शोषणासाठी ‘त्यांने’ बांधली होती छतावर झोपडी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः शहरातील एका खासगी बँकेत नोकरीला असलेल्या लिपीकाने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली. या नराधमाने तब्बल तीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मुसक्या आवळल्या. मात्र, अल्पवयींनाचे लैंगिक शोषण आरोपी मागील दोन वर्षापासून करीत होता. या घाणेरड्या प्रकारासाठी त्याने चक्के घराच्या छतावर झोपडीच बांधली होती. अशा या विकृतास शुक्रवारी (ता.6) न्यायायाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर रहिवासी असलेल्या आरोपी जयप्रकाश नारायण गावंडे (वय 56) हा आरोपी परिसरातील इयत्ता सातवी ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांना कधी पैशांचे तर कधी चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुपारी घरी कोणी नसताना बोलवायचा. त्यानंतर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करायचा. 19 फेब्रुवारी रोजी दोन ते तीन मुले आरोपीच्या रूममध्ये आरोपी सोबत झोपलेल्या अवस्थेत त्यातील एका पिडित मुलाच्या आजोबांनी बघितले. त्यानंतर या प्रकरणाचा त्यांनी जाब विचारला असता आपण मुलांना वाईट उद्देशाने बोलत नसून त्यांना चॉकलेट किंवा इतर काही वस्तू खाण्यासाठी देत असतो, त्यामुळे त्यांना बोलवतो अशी उलट मुजोरी आरोपीने केली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलांच्या नातेवाईकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर या मुलांच्या पालकांनी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिसांनी पीडित मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादवि कलम 377 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

मागील दोन वर्षापासून सुरू होता प्रकार
मुले शाळेतून घरी आल्यानंतर आरोपी त्या अल्पवयीन पीडित मुलाना घराच्या छतावर बांधलेल्या झोपडीत घेऊन जात असे. ही पीडित मुले विविध आमिषापोटी आणि धाकापोटी आरोपी सांगेल तसे करीत असत. हा प्रकार मागील दोन वर्षापासून सुरू होता. या प्रकरणात पोलिस कोठडीत आरोपीची चौकशी केल्यानंतर पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आरोपीला चार दिवसांचा पीसीआर
सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी (ता.6) आरोपीला पोलिस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी विद्यमान न्यायालयाने आरोपीस 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT