thief of a pistul of API is still can not caught by yavatmal police  
विदर्भ

यवतमाळ पोलिसांची उडाली झोप! सहायक पोलिस निरीक्षकाची पिस्टल चोरणारा आठवडा उलटूनही मोकळाच  

सूरज पाटील

यवतमाळ: सहायक पोलिस निरीक्षकाच्या घरात शिरून सर्व्हिस पिस्टल चोरी गेल्याच्या घटनेला आठवडा उलटला आहे. तरीदेखील खाकी वर्दीधारी चोरटा मोकळाच आहे. त्यामुळे गंभीर प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या पोलिस पथकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राहुलकुमार राऊत (वय 34, रा. प्रतिबिंब अपार्टमेंट, बांगरनगर, यवतमाळ) यांची सर्व्हिस पिस्टल भर दुपारी घरून चोरीला गेला होती. चोरट्याने चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या घरात हात साफ केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांसारखी दिसणारी खाकी वर्दी परिधान केलेला 50 वर्षे वयोगटातील एकाने एपीआयच्या घरात येऊन झोप उडविणारा कारनामा केला. 

याप्रकरणी राहुलकुमार राऊत यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखा व डीबीचे पथक चोरट्याचा शोध घेण्याच्या मागे लागले. चोरट्याचा थांगपत्ता लागत नसल्याने प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार रेखाचित्र तयार करून प्रत्येक पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. पथकातील कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही शोध घेतला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. 

पोलिसही या प्रकरणाचा उलगडा करण्याचा कसोसीने प्रयत्न करीत आहे. चक्क एपीआयच्या पिस्टल चोरटा गजाआड होत नसल्याने नेटवर्क कोलमडल्याचीही ओरड होत आहे. एकूण "सस्पेंश' व डोकेदुखी वाढविणाऱ्या प्रकरणातून नेमके काय बाहेर येते, याकडेही पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

चोरट्याचा शोध घेण्यासाठी रेखाचित्र जारी करण्यात आले. तांत्रिक बाजूही पडताळून बघितल्या जात आहेत. पोलिस पथक सर्वच बाजूने तपास करून शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.
- धनंजय सायरे, 
ठाणेदार, शहर पोलिस ठाणे, यवतमाळ

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT