Thieves breaks court lock 
विदर्भ

चोरट्यांनी तोडले चक्क न्यायालयाचे कुलुप

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : शहरात चड्डी बनियान शस्त्रधारी चोरट्या टोळक्याने शुक्रवार (ता.20) पहाटे अडीच ते तीनचे दरम्यान टोळक्याने चक्क न्यायालयाची इमारतही टार्गेट केले.

न्यायालयाच्या इमारतीचा दरवाजा तोडून आतील सामानाची फेकफाक केली. पंचायत समिती परिसरातील इंगळे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरी केली. तसेच आजूबाजू च्या घराचे कोंडे बाहेरून लावून घेतले. त्या नंतर शहरातील प्लाट मधील यशवंत भटकर यांचे घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. तसेच रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्र चे पाठीमागील श्रीहरी ठाकरे यांचे घरातील एका खोलीचे कुलूप तोडले व आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र याच घरासमोरील देशमुख यांना जाग आल्याने चोरट्याचा डाव फसला. आजूबाजूच्या लोकांना मोबाईल द्वारा जागे करण्यात आले. ही बाब चोरट्याच्या लक्षात येताच सदर टोळी ने अंधाराच्या दिशेने पळ काढला. यामध्ये आठ ते दहा जण चड्डी बनियन घातलेले जवळपास पाच फूट उंची डोक्यावर बारीक केस आणि हिंदी भाषा बोलणारे कमरेला काही शस्त्र लटकलेले असल्याचे पाहण्यात आल्याची माहिती आहे.  घटनेची माहिती तामगाव पोलिसांना मिळताच  पोलीस घटनास्थळी पोहचले. चोरट्यानी कुरवाडे वकील, श्याम कौलकार यांचे घरांचे कोंडे बाहेरून लावून घेतले होते. या मध्ये चोरट्यानी  नेमका काय चोरून नेले याची माहिती पोलीस घेत आहेत. वर्ष भरापूर्वी तहसील आवारातील ट्रेझरी फोडून चोरी झाल्याचा प्रकार घडलेला आहे. त्या चोरी चा तपास अद्याप सुरूच आहे.  पाच दिवस अगोदर मंदिरातील दानपेटी फोडण्याची घटना ताजी आहे. असे असताना 20 मार्च रोजी घडलेला प्रकार पोलिसां साठी आव्हानच म्हणावे लागेल. यात शस्त्रधारी टोळके दिसून आल्याचे सांगण्यात येत असल्याने शहरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची तर दुसरीकडे चोरट्यानी दहशत निर्माण झाल्याने तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटी व्ही फुटेज चा सहारा घेत असल्याची माहीती आहे .देवदेवतांच्या दान पेट्या नंतर आता  न्याय देवतेच्या घरावर चोरट्याची  नजर फिरल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT