Thieves kill 60-year-old woman 
विदर्भ

चोरीसाठी गाठले एकट्या महिलेचे घर, परंतु झटापटीदरम्यान घडला हा प्रकार...

दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्‍यातील गडचांदूर येथील महात्मा गांधी शाळेच्या मागील भागात वास्तव्यास असणारी लंकाबाई नीलकंठ मेश्राम (वय 60) या महिलेचा त्यांच्या राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर महिला येथील वॉर्ड क्रमांक 4, महात्मा गांधी शाळेच्या मागे जिल्हा परिषद शाळेजवळ गेल्या कित्येक दिवसांपासून एकटीच राहत होती. त्यांचे पती नीलकंठ मारोती मेश्राम (वय 72) वेगळे राहत होता.

महिलेच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि सदर महिला दोन-तीन दिवसांपासून कुणालाही दिसली नव्हती. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांना प्रकरण संशयास्पद वाटू लागले. घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून महिलेच्या पतीला बोलावले आणि घराचे दार उघडले तर समोर महिलेचा मृतदेह पडलेला दिसला. महिलेच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून होते. पलंगावर रक्त सांडले होते.

घटनास्थळावरील एकंदरीत दृश्‍य पाहता महिलेची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मृतदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर महिलेच्या डोक्‍यावर जखमा असल्याचे सांगण्यात आले. प्रकरण गंभीर असल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथक तैनात करण्यात आले.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचांदूर वॉर्ड क्रमांक चार येथील अब्दुल खलील अब्दुल रशीद शेख (वय 22) याला 2 जुलैच्या रात्री संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मृत महिलेच्या घरी चोरी करण्याचा उद्देशाने जाऊन महिलेच्या डोक्‍यावर दगडी पाटा, वीट, भांड्याने मारून ठार केल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती, प्रमोद शिंदे, चौधरी, शुभांगी ढगे, धर्मराज मुंडे, जगदीश झाडे, रोहित चिलगिरे करीत आहेत. अवघ्या 24 तासांच्या आत खुनाच्या आरोपीला अटक केल्याबद्दल गडचांदूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT