thieves theft 1 lac rupees from house in warora chandrapur 
विदर्भ

वरोऱ्यात घरफोडीत पावणेदोन लाखांचे दागिने लंपास; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

बाळू जीवने

वरोरा (जि. चंद्रपूर): घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील एक लाख 85 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील आंबेकर ले-आउट परिसरातील ऋषी मडावी यांच्या घरी घडली. मागील काही दिवसांतील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

करंजी मार्गावरील आंबेकर ले-आउट येथे ऋषी मडावी हे कुटुंबीयांसह राहतात. कामानिमित्त ते कुटुंबीयांसह समुद्रपूर येथे सासुरवाडीला गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मडावी यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आलमारीतील सुमारे एक लाख 85 हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. मडावी हे कुटुंबीयांसह घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.

या घटनेची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील दोंदेनगर आणि फुकटनगरातसुद्धा यापूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. 

दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनांवर अंकुश घालून चोरट्यांच्या मुसक्‍या आवळाव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT