corona agencies.jpg 
विदर्भ

चिंताजनक : वाशीम जिल्ह्यातील एकमेव बाधिताचा तिसरा अहवाल पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यामध्ये एकमेव असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाचे दोन अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. जिल्हा कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा असताना आज ता. 17 या रुग्णांचा तिसरा अहवाल पुन्हा एकदा पाॅझिटिव्ह आला आहे.

मेडशी येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयच्या विषेश कक्षात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आठ दिवसापूर्वी त्याच्या घशातील लाळेचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते. तेव्हा ते नमुने निगेटिव्ह आले होते. त्यानंतर पुन्हा चार दिवसापूर्वी लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. तेही निगेटिव्ह आले. चोवीस तासानंतर पुन्हा त्याच्या लाळेचे नमुने घेतले होते मात्र तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे नमुने पुन्हा पाॅझिटिव्ह आले आहेत. 

जिल्हा पुन्हा आॅरेंज झोनमध्ये
यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. या रुग्णाला आता पुन्हा आठ दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा त्याच्या लाळेचे नमुने घेतले जाणार आहेत. वाशीम जिल्ह्यामध्ये सध्या हा एकमेव रुग्ण आहे. तिसऱ्या तपासणीचे नमुने जर निगेटिव्ह आले असते तर या रुग्णाला सुट्टी देण्यात येणार होती. मात्र, हा रुग्ण पाॅझिटिव्ह असल्याने जिल्हा पुन्हा आॅरेंज झोनमध्ये गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT