Those two women were corona positive 
विदर्भ

दोन्ही मृत महिला होत्या कोरोनाबाधित!

सकाळ वृत्तसेवा

अमरावती :  स्थानिक हैदरपुरा आणि कमेला ग्राऊंड येथे 20 एप्रिल रोजी मरण पावलेल्या दोन्ही महिला कोरोना बाधित असल्याचे बुधवारी (ता.22) रात्री धडकलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यावरून दोन्ही कुटुंबातील 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कमेला ग्राउंड येथील 70 वर्षीय महिला घरीच मरण पावली होती, तर हैदरपुरा येथील 60 वर्षीय महिलेवर
महेंद्र कॉलनीतील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दोन्ही महिलांच्या मृत्यूपश्‍चात घेण्यात आलेले नमुने पॉझिटिव्ह आलेले आहेत. दोन्ही महिलांच्या कुटुंबातील 34 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले होते. पैकी दोन नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर हैदरपुरा येथून 12 तर कमेला ग्राउंड येथील महिलेच्या 7 नातेवाइकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईनच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वर्तविली.
शहराची लोकसंख्या अंदाजे 8.50 लाखांच्या घरात आहे. त्यादृष्टीने प्रत्येक घरात जाऊन स्वॅब नमुने घेणे शक्‍य नाही. आरोग्य विभागातर्फे घरोघरी कंटोन्मेंट क्षेत्रात प्राधान्याने सर्वेक्षण केले जात आहे. कंटोन्मेंट क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी लगतच्या नागरी रुग्णालयात स्वॅब घेण्याची व्यवस्था अस्तित्त्वात आणली जाऊ शकते. सर्दी, ताप, खोकल्याशी संबंधित व्यक्तींनी कोणताही संकोच न ठेवता रुग्णालयात स्वतः येऊन तपासणी करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले.

डॉक्‍टरला बजावली नोटीस

हैदरपुरा येथील मरण पावलेल्या 60 वर्षीय महिलेवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिली की नाही, याचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र संबंधित डॉक्‍टरांना महापालिकेने नोटीस बजावली असून 14 दिवस रुग्णालय बंद ठेवण्यास सांगितले आहे.

आणखी दोघांचा मृत्यू

शहरातील कंटोन्मेंट क्षेत्रालगतच्या तारखेडा येथे एका 40 वर्षीय महिलेचा, तर रजानगर येथील 30 वर्षीय तरुणाचा बुधवारी (ता.22) मृत्यू झाला. त्यापैकी महिलेला मधुमेह व लठ्ठपणाचा आजार होता, तर रजानगरातील युवकाला व्यसन होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: सायन पनवेल महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT