file photo 
विदर्भ

पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पत्नीनेच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला (वय 15) पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास तयार केले. त्याचे चित्रीकरण करून क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. नंतर या दाम्पत्याने गावातील त्या अल्पवयीन मुलीला खंडणीची मागणी केली. 

नांदगाव खंडेश्‍वर ठाण्याच्या हद्दीत एका गावात ही घटना घडली. शनिवारी रात्री याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यापैकी पोलिसांनी पतीला अटक केली. त्या गावातील दाम्पत्यापैकी पत्नीने शेजारच्या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेतले. तिला पतीसोबत जवळीक न साधल्यास आपले होणारे मूल मरेल, असे भावनिक आवाहन केले. त्यावर अल्पवयीन मुलीने कृती केली. घरात पतीसोबत त्या अल्पवयीन मुलीची एक क्‍लिप त्या दाम्पत्याने तयार केली. 

त्या क्‍लिपचा आधार घेऊन महिलेच्या पतीने त्या अल्पवयीन मुलीस वारंवार स्वत:च्या घरी येण्यासाठी बाध्य केले. घरी न आल्यास पूर्वी काढलेली क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित दुसऱ्यांदा त्या दाम्पत्याच्या घरी आल्यानंतर पतीने तिची दुसरी अश्‍लील क्‍लिप स्वत:च्या मोबाईलने तयार केली. त्यानंतर एका ठिकाणी पीडित अल्पवयीन मुलीला गाठून त्या व्यक्तीने चाकूचा धाक दाखविला. एक हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. 

पीडितेला महिलेच्या पतीने मारहाण केली. तिचे होत असलेले शारीरिक, लैंगिक शोषण लक्षात घेता, मनाने ती खचली. भीतभीत तिने आपल्या कुटुंबीयांजवळ घटनाक्रम सांगितला. त्यामुळे त्यांनाही धक्काच बसला. गावातील त्या दाम्पत्यास पीडितेच्या पालकांनी जाब विचारला. आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची भीती लक्षात घेता त्या दाम्पत्याने दुसऱ्या गावी निघून जाणे पसंत केले. अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी तिची समजूत काढली. तक्रार देण्यासाठी त्यानंतर पीडितेने नांदगाव खंडेश्वर ठाण्यात धाव घेतली. त्या दाम्पत्याविरुद्ध विनयभंग, मारहाण व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

दाम्पत्याचे मोबाईल जप्त 
दाम्पत्याने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून लैंगिक छळ केल्याच्या क्‍लिप, ज्या मोबाईलने तयार केल्या ते मोबाईल त्यांच्याकडून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT