vidarbha Sakal
विदर्भ

यवतमाळ : तीन बुकींच्या मुसक्या आवळल्या; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

कळंब येथील निरंजन माहूर रोडवर असलेल्या प्रवीण गुल्हाने यांच्या शेतातील घरात छापा टाकून गुरुवारी

सूरज पाटील

यवतमाळ : श्रीलंका विरुद्घ ऑस्ट्रेलिया या टि-20 विश्‍वचषक क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळविणार्‍या तीन बुकींच्या मुसक्या सायबर सेलच्या पथकाने आवळल्या. कळंब येथील निरंजन माहूर रोडवर असलेल्या प्रवीण गुल्हाने यांच्या शेतातील घरात छापा टाकून गुरुवारी ही कारवाई केली.

रितेश फकीरचंद जोशी (वय 32,रा. बोरेले ले-आउट, यवतमाळ), सागर अनंत सव्वालाखे (वय 30, रा. नेहरू चौक), नितीन बाबुलाल वर्मा (वय 39, रा. दीपक चौक, अकोला), अशी बुकींची नावे आहे. यवतमाळ शहरात छापेमारी होत असल्याने कळंब येथील शेतात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली. सायबर सेल व एलसीबीची पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी छापा टाकला असता, जुगाराचा खेळ आढळून आला.

घटनास्थळावरून हॉटलाइन पोपट, सात मोबाइल, नऊ अ‍ॅण्ड्रॉईड मोबाइल, व्हाईस रेकॉर्डर, चारचाकी कार, रोख असा एकूण 13 लाख 86 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दीपमाला भेंडे, सपोनि अमोल पुरी, पीएसआय भगवान पायघन यांच्यासह पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT