file photo 
विदर्भ

अकरावी प्रवेशासाठी पुन्हा तीन दिवस 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या अकरावी प्रवेशासाठी एक ऑक्‍टोबरपर्यंत शेवटची संधी देण्यात आली. यामध्ये फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदविण्यात आले. मात्र, रविवारी पुन्हा विभागाकडून मंगळवारपासून (ता. 15) तीन दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत (ता. 17) नोंदणी आणि प्रवेशाची संधी दिली आहे. आतापर्यंत निम्म्या म्हणजे 29 हजार 169 जागांवर प्रवेश दिले आहे. त्यामुळे 29 हजार 151 जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. 
शहरातील 58 हजार 240 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या तीन फेरीत अकरावीच्या 22 हजार 501 जागा भरण्यात आल्या होत्या. त्यानंतरही जवळपास 35 हजार 741 जागा रिक्त असल्याने नऊ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन केले होते. 14 ऑगस्टला विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रकाशित करून 16 ते 19 ऑगस्टपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. यानंतर पुन्हा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देणाऱ्या सहा फेऱ्या घेण्यात आल्या. आतापर्यंतच्या सर्वच फेऱ्यांमध्ये 29 हजार 169 प्रवेश देण्यात आले. 
कला शाखेत दोन हजार 488, वाणिज्य शाखेत सात हजार 731, विज्ञान शाखेत 17 हजार 274 तर एमसीव्हीसीत एक हजार 676 जागांवर प्रवेश देण्यात आले. सोमवारपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना एक ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असल्याचे विभागाकडून सांगितले होते. त्यानंतरही रिक्त जागांमध्ये घट झाली नसल्याने मंगळवारपासून तीन दिवस नोंदणी आणि प्रवेश देण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : मरीन ड्राइव्हजवळ भरधाव BMW चा अपघात; तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT