Threes families demanding houses 
विदर्भ

घर देता का घर ऽ ऽ ऽ कुणी ऐकेल का ही आर्त हाक 

जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यातील झरी-मांगरुड येथील गुलाब शेंडे व दिवाकर मारोती शेंडे या दोघाही भावांचे घर गतवर्षी पावसाळ्यात कोसळले. तोंडात घास पडण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागणाऱ्या या शेंडे भावडांना घर बांधणे शक्‍यच नव्हते. दोघे भाऊ आणि गुलाबचा मुलगा दयाराम यांनी मग गावातील समाज मंदिरात संसार थाटला. मागील वर्षभरापासून ते "कुणी घर देता का घर ऽ ऽ ऽ' अशी आर्जव करीत आहेत. 

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणा-या "ताडोबा-अंधारी' व्याघ्र प्रकल्पालगत पाचशे लोकवस्तींचे "झरी-मांगरुड' हे गाव आहे. इथेच शेंडे परिवाराचे अनेक पिढ्यांपासून वास्तव्य आहे. दिवाकर मारोती शेंडे आणि गुलाब मारोती शेंडे हे दोन भाऊ. गुलाबचा मुलगा दयाराम आपल्या कुटुंबासह याच गावात राहतो. सारेच अल्पभूधारक. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतीवर मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ते चालवितात. वडिलोपार्जित मोडकळीस आलेल्या घरात त्यांचे राहणे होते. मात्र गतवर्षी वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने घर जमीनदोस्त झाले. 

घर जमीनदोस्त झाले आणि तेव्हापासून रस्त्यावर आलेले हे तीनही परिवार हवालदिल झाले. परंतु ते पुन्हा विटेवर वीट चढवू शकले नाहीत. त्यांच्यात एवढी ऐपतच नाही. तेव्हापासून या तिघांच्याही कुटुंबीयांनी गावातील समाज मंदीरात आसरा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे पडलेल्या घराचे आणि झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण महसूल विभागाने केले. परंतु वर्षभराचा कालावधी लोटला. परंतु मदतीची एक दमडीही मिळाली नाही. ग्रामपंचायतमार्फत तिघांनीही घरकुलासाठी अर्ज सादर केले. मात्र याही योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळतो. परंतु संकटातील शेंडे कुटुंबीय या लाभापासूनही वंचित आहेत. 

अर्ज केला

आम्ही दारिद्य्र रेषेखालील जीवन जगत आहोत. घरकुलासाठी अर्ज केला आहे. परंतु अजून घरकुल मिळाले नाही. 
-गुलाब शेंडे आणि दिवाकर शेंडे 
झरी-मांगरुड, ता. चिमूर 

घरकुल मंजूर झाले नाही

गुलाब शेंडे, दिवाकर शेंडे आणि दयाराम शेंडे समाज मंदिरात राहतात. तिन्ही परिवार दारिद्रय रेषेखालील आहेत. चिमूर पंचायत समितीकडे ग्रामपंचायत मार्फत घरकुलासाठी अर्ज पाठवला. मात्र अद्याप त्यांचे घरकुल मंजूर झाले नाही. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. 
-वासुदेव बावणे 
उपसरपंच झरी-मांगरूड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT