three lakh and fifty thousand fine to hotel for extra people present in hotel in amravati 
विदर्भ

फडणवीसांच्या उपस्थितीमधील सभेत साडसातशेपेक्षा अधिकजण, हॉटेल मालकाला साडेतीन लाखांचा दंड

सुधीर भारती

अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील एका पॉश हॉटेलच्या लॉनवर उमेदवाराच्या प्रचार सभेत नियमांचे उल्लंघन करीत साडेसातशे अधिक लोक उपस्थित राहिले. मात्र, आता प्रशासनाने याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकांनाच साडेतीन लाखांचा दंड ठोठावला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून शहरातील अन्य मंगल कार्यालये, लॉन्स चालकांना सुद्धा इशारा देण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, लग्न समारंभाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही सध्या शहरात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेते मंडळींचे मेळावे घेण्यात येत आहेत.

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या हॉटेलच्या लॉनवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत त्या मेळाव्यात 700  लोक हजर असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रतिव्यक्ती 500 रुपये याप्रमाणे तीन लाख 50 हजार रुपयांचा दंड संबंधित संचालकांना ठोठावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. दंडाची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली आहे. शहरात प्रथमच एका हॉटेल संचालकांना जबर दंड ठोठावण्यात आला असून अन्य मंगल कार्यालय तसेच सभागृह चालकांना हा इशाराच मानला जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW Final : स्मृती मानधनाची विश्वविक्रमी खेळी! शफाली वर्मासोबत इतिहास घडवला; भारताच्या 'सुवर्ण'पदकाचा पाया भक्कम

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

SCROLL FOR NEXT