file photo 
विदर्भ

यवतमाळात कमी किमतीत सोने घ्यायला गेले अन्‌ घडले विपरीत...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्‍यातील उमरी येथील शेख बाबा शेख मेहबूब कुरेशी (वय 64) यांना शेतात नाल्याच्या बंधाऱ्याचे बांधकाम करावयाचे असल्याने गेल्या 22 दिवसांपूर्वी त्यांनी हरिदास कुचनकर याला फोनद्वारे बोलावून घेतले. बोलणीनुसार बंधाऱ्याचा ठेका ठरवून दिला.


कुचनकरसोबत असलेल्या भय्याजी कोहचाडे याने शेख बाबा यांना माझ्या मित्राने जमिनीतून सोने काढले आहे. ते कमी भावात मिळवून देतो, असे आमिष दाखविले.

सौदा पडला महागात

सौदा करण्यापूर्वी सात सोन्याचे क्वॉइन दाखवून एक पाव सोन्याची किमत तीन लाख रुपये ठरविली. त्यानुसार शुक्रवारी कुचनकर, शेख बाबा व त्यांचा जावई असे तिघे चारचाकी वाहनाने सावळी सदोबा येथील आयटीआय कॉलेजजवळ थांबले. कैलास ऊर्फ करण चव्हाण (वय 40) व भीमराव या दोघांनी त्यांना पैसे घेऊन मंदिराकडे येण्यास सांगितले.

सोन्याची थैली, तीन लाख रुपये पळवले

त्यावेळी दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी आम्ही पोलिस आहोत, अशी खोटी बतावणी केली. सोने असलेली लाल रंगाची थैली घेतली. कुचनकर यांच्या शर्टाच्या पन्नीत ठेवलेले तीन लाख रुपये काढून घेतले आणि घटनास्थळावरून पळ काढला. कमी भावात सोने देण्याचे आमिष दाखवून शेख बाबा यंची फसवणूक करण्यात आली.

अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

ही घटना घडल्यावर शेख बाबा शेख मेहबूब कुरेशी यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कैलास चव्हाण, भीमराव यांच्यासह अन्य चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक माहितीसाठी ठाणेदार गोरख चौधर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT