संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

उपराजधानीत चार तासांत तीन खून

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः मुख्यमंत्र्यांच्या शहरात बुधवारी रात्री वेगवेगळ्या भागांत अवघ्या चार तासांत तीन हत्याकांड घडले. यामध्ये एका नामांकित प्रॉपर्टी डीलरसह दोन तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आरोपींमध्ये युथ फोर्सचा संस्थापक अध्यक्ष मिकी बक्षीसह गिरीश ऊर्फ नानू दासलवार याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्याकांडाच्या मालिकेतील पहिली घटना नंदनवनमधील केडीके कॉलेज रोडवरील राजेंद्रनगर येथे घडली. गरीब नवाज चौक, खरबी येथे राहणारा मो. आसिफ शेख मो. सईद (25) हा हातठेल्यावर सांबार, मिरची, अद्रक विकण्याचा धंदा करतो. बुधवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास राजेंद्रनगर येथील स्टेट बॅंकेच्या एटीएमसमोर तीन अनोळखी आरोपी आले. त्यापैकी एकाने अद्रक आणि मिरची खरेदी करून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि पैसे न देता ते जाऊ लागले. मो. आसिफने त्यांना पैसे मागितले असता आरोपींनी त्याला शिवीगाळ केली आणि मांडीवर चाकूने वार केला. त्याचवेळी आसिफचा मित्र सय्यद इमरान सय्यद नियाज (22) हसनबाग हा आसिफला वाचविण्यासाठी आला असता आरोपींनी इमरानला पकडून त्याच्यावर छातीवर चाकूने वार करून त्याला जागीच ठार केले. त्याचप्रमाणे गल्ल्यातील एक हजार रुपये काढून पोबारा केला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरे हत्याकांड नंदनवनमधील मुंगसाजीनगरात घडले. सेनापतीनगर येथे राहणाऱ्या विक्की विजय डहाके (22) याचा तडीपार असलेला गुंड रिषी ऊर्फ नरेश पुट्‌टेवार आणि सागर महात्मे (रा. नरसाळा) यांनी खून केला. विक्की हा हातमजुरी करीत होता. बुधवारी रात्री 11 वाजतापूर्वी सेनापतीनगरच्या मोकळ्या मैदानात तो मृतावस्थेत मिळून आला. अज्ञात आरोपींनी त्याच्या पोटावर, पाठीवर, पायावर वार करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तिसऱ्या घटनेत, ऋषी खोसला या प्रॉपर्टी डीलरचा गुंड मिकी बक्षी याने खून केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT