file photo 
विदर्भ

यवतमाळ ब्रेकिंग : जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण दगावल्याने खळबळ...

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनकच आहे. आज, सोमवारी (ता. 15) तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित मृत्यूचा आकडा सहा झाला आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेले दोन जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

सोमवारी मृत्यू झालेल्यांमध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यात पुसद येथील 60 वर्षीय व दारव्हा येथील 45 वर्षीय पुरुष, तर दारव्हा येथीलच 66 वर्षीय महिलेचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या तिघांनाही सारी आजाराची लक्षणेसुद्धा होती.

146 जण झाले बरे

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यःस्थितीत 32 ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 39 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 184 वर गेली असून, यापैकी 146 जण बरे होऊन घरी गेले आहेत; तर सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा

रेड झोनमधून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये. शिवाय स्थानिक लोकांनीसुद्धा आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल तत्काळ तालुकास्तरीय समितीला कळवावे. नागरिकांनी अनावश्‍यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये. या विषाणूच्या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी घरातच सुरक्षित राहावे. अत्यावश्‍यक कारणासाठी बाहेर पडले तर मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे. शिवाय शासन व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT