death sakal media
विदर्भ

फिरायला जाणे जीवावर बेतले, डोहात बुडून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चिखलदरा ( अमरावती) : चिखलदरा (chikhaldara tourism) पर्यटन स्थळावर फिरायला आलेल्या अकोला येथील दोन पर्यटकांचा जत्राडोहच्या डोहात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३. ३० वाजता ही घटना घडली. दोघांचे मृतदेह डोहाबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी पाठविण्यात आले आहे. दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील डोहात आंघोळीसाठी उतरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

शेख इकरम शेख हुसेन कुरेशी २६ व शेख आजीम शेख सकुर २७ अकोट फैल अकोला, अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही ९ मित्रांसोबत चारचाकी वाहनाने चिखलदरा येथे गेले होते. चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविध स्थळांना भेट दिल्यानंतर, सर्व मित्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभागाअंतर्गत जत्राडोह पॉईंट आहे. त्याठिकाणी गेले. येथे कोसळणाऱ्या धबधब्याखाली डोहात उतरण्यास सक्त मनाई आहे. तरीसुद्धा ते पाण्यात उतरले. दरम्यान, दोघे खोल पाण्यात उतरल्याने बुडाले. पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश राठोड, सुधीर पोटे, आशिष वरघट, रितेश देशमुख करीत आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.

खटकाली डोहात एकाचा मृत्यू-

दुसऱ्या एका घटनेत चिखलदरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोपटखेडा खटकाली मार्गावरील पीर बाबा नदीच्या डोहात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. हरीश जानराव काळमेघ (३८ रा चौसाळा तालुका अंजनगाव), असे मृताचे नाव आहे. शनिवारी आंघोळीसाठी डोहात उतरले असता बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी काढण्यात आला. पुढील तपास ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अविनाश देशमुख, प्रभाकर चव्हाण, रायबा जावरकर करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT