भूपेश थूलकर  
विदर्भ

थूलकर म्हणाले, आठवले गटाला हव्या 16 जागा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप, सेना, आरपीआय (ए), रासप आदी पक्ष महायुती करून निवडणूक लढणार आहेत. भाजप, सेनेत जागांवरून मतभेद असताना आरपीआय आठवले गटाला 16 जागा हव्या आहेत. तसा प्रस्ताव भापजच्या प्रदेश अध्यक्षांना पक्ष प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष भूपेश थूलकर यांनी शुक्रवारी रविभवन येथे पत्रकार परिषदेत दिली.
देशपांडे सभागृहात सहा सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पक्षाचा विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा मेळावा महत्त्वाचा आहे. उद्‌घाटन राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. आमचा पक्ष विदर्भ राज्याचा पक्षधर राहिला आहे. मेळाव्यात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव पारित करण्यात येईल. त्याचप्रमाणे विविध प्रस्तावही पारित करण्यात येणार असल्याची माहिती थूलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

SCROLL FOR NEXT