Tiger Fell Down in Well sakal
विदर्भ

Tiger : रानकुत्रे मागे लागल्याने शेतातील विहिरीत पडला वाघ

पाण्याच्या शोधात गावात आलेल्या वाघामागे रानकुत्रे लागले. त्यामुळे त्यांच्या तावडीने सुटण्यासाठी पळत सुटलेला वाघ गावाशेजारी असलेल्या एका विहिरीत पडला.

सकाळ वृत्तसेवा

नागभीड - पाण्याच्या शोधात गावात आलेल्या वाघामागे रानकुत्रे लागले. त्यामुळे त्यांच्या तावडीने सुटण्यासाठी पळत सुटलेला वाघ गावाशेजारी असलेल्या एका विहिरीत पडला. गुरुवार (ता. ११) तालुक्यातील कोदेपार गावात ही घटना घडली. वाघ विहिरीत पडल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी येत नागरिकांना विहिरीपासून दूर केले.

नागभीड तालुक्यात कोदेपार हे गाव येते. जवळपास चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेले गाव अगदी जंगलाला लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे जंगलातील नाले, पाणवठे कोरडे पडू लागले आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावात येऊ लागले आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास एक वाघ पाण्याच्या शोधात गावाकडे येत होता. याचदरम्यान रानकुत्रे गावात आले. त्यांनी डुकरांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डुकरे त्यांच्या हाती आली नाही. त्यामुळे रानकुत्रे गावाशेजारीच होते. दुपारी दीड ते दोन वाजतादरम्यान वाघ आला. वाघ दिसताच रानकुत्रे त्याच्यामागे लागले. रानकुत्र्यांची टोळी मागे लागल्याने वाघ गावाकडे पळत सुटला.

जंगलाशेजारीच नामदेव कोडापे यांची शेती आहे. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वाघ पडला. दुपारी कोडापे शेताकडे आले. तेव्हा त्यांना वाघ आला. त्यांनी लगेच याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी सुनील हजारे आणि पोलिस निरीक्षक विजय राठोड चमूसोबत घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी विहिरीजवळ जमलेली गर्दी कमी केली. त्यानंतर विहिरीत टिनाचे पत्र दोर बांधून सोडले. त्याच टिनाच्या पत्रावर वाघ बसला. हळूहळू दोर ओढून वाघाला विहिरीबाहेर काढण्यात आले. विहिरीबाहेर निघताच वाघाने जंगलाकडे धूम ठोकली.

एक तास परिश्रम

वाघ विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी विहिरीत टिनाचे पत्र दोर बांधून सोडले. त्याच टिनावर बसून वाघ विहिरीबाहेर आला. या प्रक्रियेला जवळपास एक तास लागला. नागरिकांची गर्दी असल्याने विहिरीबाहेर जाळे लावण्यात आले. वाघ बाहेर येताच जाळे काढण्यात आले. त्यामुळे वाघाने जंगलाकडे धूम ठोकली आणि नागरिकांनी सुटकेचा निः श्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Auction Live: मुंबई इंडियन्सचा अजब डाव! ५.७५पैकी एकाच खेळाडूवर खर्च केले ३ कोटी; कोण आहे ती?

पुण्यातील बँकेत चक्क दर्शनासाठी होतेय भाविकांची गर्दी, 3.5 किलो सोन्याच्या दत्त मूर्तीचं वर्षातून एकदाच दर्शन, 60 वर्षांची परंपरा

Ajit Pawar: ''भाऊ म्हणून बहिणीचं रक्षण करणार'', अजित पवार उज्वला थिटेंवर पहिल्यांदाच बोलले, पाटलांना दिला दम

Latest Marathi News Live Update : SIR प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली

Gond Laddu Recipe: हिवाळ्यासाठी डिंक लाडू बनवताय? मग यंदा ट्राय करा राजस्थानी पद्धतीची खास रेसिपी

SCROLL FOR NEXT