tiger 
विदर्भ

दहशत : शौचास गेलेल्या व्यक्तीला वाघाने केले ठार

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : शौचास गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना बुधवारी (ता. 25) दुपारी बाराच्या सुमारास घडली. मृताचे नाव मंगेश कोडापे आहे. शहरालगत असलेल्या वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 155 परिसरात ही घटना घडली.

राजुरा शहराला लागून असलेल्या वनक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांना सावध राहण्याबाबत वनविभागाची जनजागृती गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी इंदिरानगर वस्तीला लागून असलेल्या वनात मंगेश कोडापे शौचाला गेला होता. त्याच वेळेला तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.
 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरानजीकची घटना
बराचवेळ लोटूनही मंगेश परत आला नाही. त्यामुळे परिसरातील युवकांनी पाहणी केली असता, मंगेशचा मृतदेहच आढळून आला. राजुरा तालुक्‍यात मागील महिन्यापासून वाघाची दहशत आहे. तालुक्‍यातील मूर्ती येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाला होता. चिचबोडी येथे वाघाने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले होते. 50 वर्षांची परंपरा असलेली जोगापूरची यात्रा वाघाच्या दहशतीमुळे स्थगित केली गेली. अशात वाघाने पुन्हा एकाचा बळी घेतल्याने भीती पसरली आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


दोन दिवसांतील दुसरी घटना
वाघाने हल्ला करून माणसाला ठार मारण्याची ही जिल्ह्यातील दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. मंगळवारी (ता. 24) नागभीड तालुक्‍यातील मिंडाळा येथील सुलोचना हरी चौधरी नावाच्या महिलेलासुद्धा वाघाने हल्ला करून ठार केले होते. त्या शेतात काम करीत असताना ही घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Conflict : "नरकात तुमचं स्वागत, सैन्य पाठवाल तर बनेल कब्रस्तान; इराणचा अमेरिकेला थेट इशारा

Vardha News: भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी; कोसुर्ला शिवारातील घटना : ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने अपघात

Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी

Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श;‘सेवाकर्मी’त उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओंचा गौरव!

SCROLL FOR NEXT