A tiger was found dead in Ashti area of Wardha district 
विदर्भ

वर्धा जिल्ह्यातील आष्टी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला; नैसर्गिक मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : आष्टी वनपरिक्षेत्रातील साहूर गावानजीक असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या मागील बाजूस नदीकाठावर बेशरमांच्या झुडपांमध्ये वयस्क वाघाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन करू वाघाच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. तीन महिन्यांत आतापर्यंत १४ वाघांचा मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अप्पर वर्धा धरणाचे बॅक वॉटर साहूर रोहणा या गावादरम्यान असून आज सकाळी मासेमारी नियंत्रणासाठी असलेली पेट्रोलिंग बोट या भागात गस्तीवर असताना चमूला निर्मनुष्य भागात एक वाघ मृतावस्थेत दिसून आला. गस्तीवरील चमूने ही माहिती तातडीने वनविभागाला कळविली. माहिती मिळताच प्रभारी उपवन संरक्षक तुषार ढमढेरे, सहायक वनसंरक्षक बी. एल. ठाकूर, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

वाघाचा मृतदेह किमान आठ-दहा दिवसांपासून येथे पडून असल्याने इतर मांसाहारी वन्यप्राण्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे दिसून आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे, डॉ. कोहाड, डॉ. बांगरे व डॉ. कांबळे या चमूने मृत वाघाचे परीक्षण करून वैद्यकीय परीक्षणासाठी नमुने संकलित केले. वाघाच्या मृतदेहाजवळ वन्यप्राण्यांची पदचिन्हे आढळून आली. तसेच वाघाचे दात झिजलेले व गळून पडलेले दिसून आले. मृत वाघ साधारणतः १३-१४ वर्षांचा असून नैसर्गिक मृत्यू झाला असावा व शव नदीच्या प्रवाहात वाहत आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाची आरती सुरू

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT