tigress found dead in bore dam canal in selu of wardha
tigress found dead in bore dam canal in selu of wardha 
विदर्भ

बोरधरणाच्या कालव्यात आढळला वाघिणीचा मृतदेह, कारण अस्पष्ट

रूपेश खैरी

सेलू (जि. वर्धा) : केळझर येथे बोरधरणाच्या मुख्य कालव्यात वाघीण मृतावस्थेत आढळून आली. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 

केळझर येथे पिरबाबाच्या दर्ग्यानजीक आदिवासी जंगल कामगार संस्थेच्या शेताजवळ बोरधरणाचा मुख्य कालवा आहे. या कालव्यातून वाहत असलेल्या पाण्यात दीड वर्ष वयाची वाघीण मृतावस्थेत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्यांना दिसले. ही माहिती गावात पोहोचताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य, क्षेत्र सहायक दिनकर पाटील यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृत वाघिणीला कालव्याबाहेर काढून काही घातपात झाला का म्हणून खात्री करून घेतली. मात्र, वाघिणीला कुठेही जखमा वा इतर निशाण दिसून आले नाही. तसेच तिचे सर्व अवयवही व्यवस्थित होते. 

घटनास्थळी सहायक वनसंरक्षक, बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, वन्यजीव मित्र कौशल मिश्रा, संजय इंगळे, पोलिस उपनिरीक्षक नलावडे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी मोक्‍यावर तळ ठोकून होते. शव विच्छेदनानंतर वाघिणीला अग्नी देण्यात आला. परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे बोलले जात असून नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. 

वनविभागाच्या गस्तीचा अभाव - 
या भागात वन्यप्राण्यांची ये-जा असल्याने वनविभागाची गस्त असणे आवश्‍यक आहे. वाघीण मृतावस्थेत आढळलेल्या या भागालगत असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारात याच कालव्यात काही महिन्यापूर्वी बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. असे असतानाही वनविभागाकडून या भागात गस्त घालीत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT