विदर्भ

‘प्रसूतीवेळी पती लेबर रूममध्ये उपस्थित हवा’

सकाळवृत्तसेवा

नागपूर -  लग्नानंतर संसारात आई होणे...हा प्रत्येक महिलेसाठी एक सर्वांगसुंदर सोहळा आहे. आई होण्याइतकी आनंदाची गोष्ट तिच्या आयुष्यात नाही. मातृत्व सोहळ्याच्या या आनंदात ती वेदनांचा आनंद घेते. याप्रसंगी ती मातृत्वासाठी मृत्यूशी झुंज सुरू असते, परंतु अनेकदा मुलगी झाली किंवा इतरही क्षुल्लक कारणांसाठी त्या मातेला मारहाण केली जाते, तिला घटस्फोट दिला जातो. यामुळे प्रसूतीच्या वेदनांची जाणीव पुरुषांनाही व्हावी यासाठी लेबररुममध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये पतिला उपस्थित ठेवण्यात यावे, असे नागपुरचे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी स्पष्ट केले आहे.

दै. सकाळतर्फे गेल्या तीन वर्षांत मतदार संघातील विकास कामांचे ऑडिट रिपोर्ट कार्डच्या रुपाने प्रकाशित केले. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी विविध विषयांना स्पर्श केला. त्यावेळी ते बोलत होते. 

विधानसभेत डॉ. माने यांनी पत्नीच्या प्रसूतीच्या वेळी पतीला उपस्थित ठेवण्यासंदर्भातील विषयाला हात घातला होता. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी या विषयाचे कौतुक केले, परंतु सामाजिक आणि धार्मिक अडचणी लक्षात घेतल्यानंतर हा विषयासंदर्भात विचार करण्यात येईल, असे त्यावेळी उत्तरात सांगितले होते. 

विषय लावून धरणार
महिलेला प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदनांची जाणीव लेबर रूमबाहेर असलेल्या पतीला होत नाही. केवळ मूल झाल्याचा आनंदोत्सव ते साजरा करतात. आनंदोत्सव साजरा करताना मातेच्या प्रसूतीच्या वेदनांची जाणीव पुरुषांनाही व्हावी यासाठी प्रसूतीसमयी नवऱ्याला उपस्थित ठेवण्यात यावे, हा विषय लावून धरणार आहे. पत्नीच्या प्रसूतीच्या वेदना कळल्यानंतर पती पत्नीबद्दलचा आदर बाळगेल. वेदनांची जाणीव झाल्यामुळे मुली आणि मुलांचा जन्म सारखाच असतो, याचे भान त्याला येईल. मुलींच्या जन्माचे तो स्वागत करेल. तसेच पत्नीचाही सन्मान करेल अशी भावना डॉ. माने यांनी व्यक्त केली.

पोटातील मूल आडवं असलं, गुंतागुंत झाली तर अशा महिलेवर शस्त्रक्रिया करणं जोखमीचं असतं. अशावेळी बाळ जन्माला घालत असताना तिची मृत्यूशी लढाई सुरु असते. थोडी चुक झाली तर महिलेस जीवाची भीती असते. ही शस्त्रक्रिया आई आणि बाळ असे दोन जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची असते. हे सर्व वेदनांनी भरलेले दृश्‍य पती आयुष्यभर नजरेत साठवून ठेवेल. महिलेचा त्याग नेहमीच त्याच्या लक्षात येईल. यासाठी प्रसूतीच्या वेळी पतीची लेबररुममध्ये हजेरी आवश्‍यक आहे. विशेष असे की, डॉक्‍टरांसमोर जीव वाचवण्याचे असलेले आव्हान ते कसे पेलतात, हे त्याला समजेल.
-डॉ. मिलिंद माने, आमदार, उत्तर नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT