Tipeshwar Sanctuary Tourists from Maharashtra and Andhra Pradesh are fascinated tigers tourism yavatmal goole
विदर्भ

टिपेश्‍वर अभयारण्य; महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील पर्यटकांना वाघांची भुरळ

यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात पर्यटकांना हमखास व्याघ्रदर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील पर्यटकांना टिपेश्‍वर अभयारण्य खुणावत आहे.उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नागरिकांना घराबाहेर पडायला मिळाले आहे. त्यातच टिपेश्‍वर अभयारण्यात बच्चेकंपनीही उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसते. टिपेश्‍वर अभयारण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध असल्याने गर्दी होताना दिसते.

निसर्गसौंदर्य आणि वाघांनी टिपेश्‍वर अभयारण्य नटलेले आहे. येथे मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, कर्नाटक यांसह इतर भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. १४८ किलोमीटर परिसरात टिपेश्‍वर अभयारण्य आहे. अभयारण्यामुळे जवळपास शंभरपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे. सकाळी साडेपाच वाजता जंगल सफारीसाठी प्रवेश दिला जातो.

वाघ, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा या वन्यप्राण्यांसह दुर्मीळ पक्षीही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या उन्हाळ्यात आर्ची या वाघिणीसह तिच्या बछड्यांनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. वन्यप्राण्यांसाठी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर वाघ पाणी पिण्यासाठी येतात. त्यांचे ठरावीक ठिकाण असल्याने तेथेच ते येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT