bus accident
bus accident 
विदर्भ

टायर फुटून बस उलटली; 19 प्रवासी जखमी 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती ते नागपूर महामार्गावर हॉटेल वाटिकासमोर खासगी वाहतूक कंपनीची बस उलटली. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले. ही घटना आज, बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास घडली. 
मंगळवारी (ता.22) दुपारी धुळे येथून रॉयल ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस (एमएच 40-0997) नागपूरला जाण्यासाठी निघाली. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास अमरावती- नागपूर महामार्गावर नांदगावपेठ हद्दीत बसचा समोरील एक टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटली. यात 19 प्रवासी किरकोळ जखमी झाले. श्रुती जोशी, स्नेहल वानखडे, नम्रता लाड, नेतल घोवरे, सिद्धार्थ शर्मा, मनसुरी (सर्व रा. जळगाव), शेख ताबीज (रा. मलकापूर), गुलफाम अली कुरेशी (रा. धुळे), अजाब मस्त्रे (रा. कळमेश्वर), गौतम गवई, सुमित मोकासे (दोघेही रा. अकोला), गायत्री माथने, राजेश झुनके, गणेश उईके, ऋषिकेश गुडदे, संजय पाटील, अक्षय बागडे, सरफराज खान, भूपेंद्र ठाकूर, हनिफ हमीद (सर्व रा. नागपूर) अशी जखमींची नावे आहेत. नांदगावपेठ पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT